नागपुरात 31 नवीन कोव्हिड रुग्णालये होणार, मनपाचे आदेश, रुग्णालयांकडून मागवला अहवाल

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने 31 नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात परीवर्तीत होणार आहेत (Nagpur Corona Hospital).

नागपुरात 31 नवीन कोव्हिड रुग्णालये होणार, मनपाचे आदेश, रुग्णालयांकडून मागवला अहवाल
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 8:22 AM

नागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने 31 नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात परीवर्तीत होणार आहेत (Nagpur Corona Hospital). यासंदर्भातील एक आदेश नागपूर महानगरपालिकेने निर्गमित केला आहे. पालिकेने 24 तासात संबंधित रुग्णालयांकडून सदर रुग्णालय कोव्हिड रुग्ण दाखल करून सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागवला आहे (Nagpur Corona Hospital).

नागपुरात आता कोव्हिड (डीसीएच) रुग्णालयांची संख्या एकुण 62 झाली आहे. पालिकेने दिलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, 24 तासात रुग्णालयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील 48 तासात कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित रुग्णालयांना भरती करता येणार आहे.

जे रुग्ण दाखल होतील त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावा, असेही आदेशात नमूद केले आहे. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाईम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्यावत करणे अनिवार्य राहील.

दरम्यान, नागपुरात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता मास्क न घालणाऱ्यांवरही महापालिकेची जोरदार कारवाई सुरु आहे. उपद्रव शोध पथकांकडून कारवाई सुरु आहे. दोन दिवसात 467 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 93 हजार 400 रुपयांचा दंड आकारला आहे. नागपुरातील प्रत्यक झोनमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. आठवड्या भरात 11 हजारावर रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात 11 हजार 145 रुग्णांची नोंद तर 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 1741 रुग्णांनाची नोंद झाली तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात एकूण रुग्ण संख्या 38 हजार 139 झाली, तर एकूण मृत्यूची संख्या 1261 झाली आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur Corona : नागपूरमध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ, 65 पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण

पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार : अजित पवार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.