2 वर्षापासून अजित पवार यांच्या इमेजला धोका, चंद्रशेखर बावनकुळे यांना नेमकं काय म्हणायचंय?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच दरम्यान त्यांनी येत्या मंगळवारी मोठा प्रवेश होणार असल्याचे म्हंटले आहे.
नागपूर : अजित पवार हे भाजप सोबत जाणार, त्यांच्यासोबत चाळीस आमदार आहेत. महाराष्ट्रातील सरकार स्थिर राहील अशा विविध चर्चा सुरू असतांना अजित पवार यांनी खुलासा केल्यानंतर अजित पवार यांच्या चर्चेला अजित पवार यांच्याकडून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अजित पवार यांच्या बद्दलच्या उघड चर्चा बंद झाल्या असल्या तरी दबक्या आवाजातील चर्चा बंद होणार नाहीत. त्याचे कारण म्हणजे अजित पवार यांनी भाजप सोबत पहाटेच्या दरम्यान भाजप सोबत केलेला शपथविधी. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार चाळीस आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार किंवा प्रवेश करणार या चर्चेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या इमेजवर भाष्य केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे माध्यमांशी बोलत असतांना अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कुठलाही संपर्क केला नाही. आणि भाजपने देखील कुठला संपर्क केला नाही. गेल्या दोन वर्षांपासून अजित पवार यांच्या इमेजला धोका पोहचवला जातोय.
कपोलकल्पित बातम्या पेरल्या जात आहे. अजित पवार यांचे विरोधक अजित पवार यांच्या विरोधात हे काम करीत आहे. त्याला काही तथ्य नाही. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेले तेव्हापासून या बातमीला सुरुवात झाली ना. आणि अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे.
अजित पवार यांनी त्यांच्या बोलण्यात सुरुवात कुणी केली हे सांगितले आहे. अजित पवार यांच्या इमेजला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपकडून हे केले जात नसून महाविकास आघाडीतील नेते करीत आहे.
एकूणच अजित पवार यांच्या बाजूनेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर विरोधक असतांना टीका करणं टाळलं आहे. याच दरम्यान त्यांनी पुढील मंगळवारी मोठा प्रवेश होणार असल्याचे म्हंटले आहे.
भाजपमध्ये दर मंगळवारी पक्षप्रवेश होणार आहे. त्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील एका भुजबळ समर्थकाचा प्रवेश घडवून आणला आहे. त्यानंतर आता कोणत्या नेत्याला भाजप धक्का देणार? कोणत्या मोठ्या नेत्याचा प्रवेश होणार आहे? याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे.