पुलवामा हल्ल्यावेळी आरडीएक्स पोहचलं कसं? संजय राऊत यांनी सवाल उपस्थित करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले राऊत?
2019 च्या निवडणुकीपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यावरून संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी केली आहे.
नागपूर : 2019 च्या निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे झालेल्या हल्ला राजकारणासाठी घडवून आणला गेला होता का? राजकारण करण्यासाठी हत्या झाली का? कडेकोट सुरक्षा असतांना तिथं आरडीएक्स कसं पोहचलं असे विविध सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरून मोदी सरकारवर तेव्हा सुध्दा प्रश्न उपस्थित केले गेले होते, पण त्यावेळी कोणी बोललं तर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल अशी भीती दाखवली जायची पण आता मोदी सरकारवरच देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. पुलवामा हल्ला घडवून आणला का अशी शंका तेव्हाही उपस्थित केली होती असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान सारखा मुद्दा उपस्थित करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, हल्ला करून निवडणुका जिंकल्या होत्या का? असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
2019 च्या निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे दीडशे किलोच्या वर आरडीएक्सच्या माध्यमातून भारतीय जवानाच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामध्ये चाळीस जवान शाहिद झाले होते. संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात होती. त्यानंतर विरोधकांनी हल्ल्याच्या संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते.
याशिवाय संपूर्ण सीमेवर कडेकोट सुरक्षा असतांना पुलवामा हल्ला घडलाच कसा? इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स पोहचले कसे? असे विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केला होता. भारताने बदला घेतला असेही त्यावेळी सांगण्यात आले होते.
मात्र, त्यावरच नागपूर येथे संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारच्या कामगिरीवर शंका उपस्थित करत हल्लाबोल करण्यात सुरुवात केली आहे. मोदी सरकारवरच राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी करत निशाणा साधला आहे.
सर्जिकल स्ट्राईक केले होते म्हणजे भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅराकमांडो ही कामगिरी करत असतात. खडतर प्रशिक्षण घेऊन ही कारवाई केली जाते. यामध्ये अचूक नियोजन आणि अनेक दिवस तयारी करावी लागते.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला उत्तर द्यायचे म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यानंतर भारतीय लष्कराचे संपूर्ण जगभरात कौतुक केले जात होते. ऐन 2019 च्या निवडणुकीपूर्वी ही घटना घडल्यानंतर विरोधकांनी त्यावर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले होते.