आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, त्यांचा पासपोर्ट जमा करा; भाजपच्या नेत्याची मागणी

Aditya Thackeray : उद्धव ठाकरे यांनाच कमळावर निवडणूक लढण्याची गरज आहे, असं विधान भाजप नेत्याने केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, त्यांचा पासपोर्ट जमा करा, असंही या नेत्यानं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, त्यांचा पासपोर्ट जमा करा; भाजपच्या नेत्याची मागणी
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 1:52 PM

नागपूर | 13 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. नितेश राणे यांनी राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे. आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा पासपोर्ट जमा करा, असं म्हणत भाजपचे नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच दिशा सालियान प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण होईल. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होईल आणि दिशा सालियानला न्याय मिळेल. असं नितेश राणे म्हणालेत. हिवाळी अधिवेशनावेळी नितेश राणे माध्यमांशी बोलत होते. तेव्हा नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे.

नितेश राणे यांचा आदित्या ठाकरेंवर निशाणा

मी सरकारचे आभार मानेल. दिशा सालियन असो सुशांत सिंग राजपूत यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम करत आहेत. तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. काल एसआयटी नेमली आहे. या मर्डर आणि गँग रेप प्रकरणातील हे आरोपी मुक्त आणि मोकाट फिरत आहेत. हे सगळे पकडले जातील. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळेल. आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लूक आऊट नोटीस काढावी. पासपोर्ट जप्त करावा. अशी मागणी सरकारकडे मी करत आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

उद्धव ठाकरेंना सवाल

मुलगाच नालायक निघाल्यावर वडील काय करणार? त्याच्या थोबाडाला आम्ही कुलुप लावलं आहे का? तुमचं सरकार होतं तेव्हा चौकशी का लावली नाही?, असा सवाल नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

राऊतांवर निशाणा

संजय राऊत आम्हाला राजकीय दलाल वाटतो. स्वतः चा भाऊ मशालवर लढणार की शरद पवार यांच्या चिन्हावर लढणार? हे सांगावं. मशाल चिन्ह नको म्हणून घरात भांडण सुरु आहे. त्याच्या मालकाला पण कमळसोबत यायची इच्छा आहे, मग पायघड्या का घालत आहेत?, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.