नितीन गडकरी रेमडेसिव्हीरसाठी मैदानात, सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीशी चर्चा, एका फोनवर 4 हजार इंजेक्शनची सोय

नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून 'मायलन इंडीया'ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत. Nitin Gadkari Mylan India

नितीन गडकरी रेमडेसिव्हीरसाठी मैदानात, सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीशी चर्चा, एका फोनवर 4 हजार इंजेक्शनची सोय
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 6:27 PM

नागपूर: महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सक्रिय झाले आहेत. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात आली आहेत. (Nagpur Nitin Gadkari calls president of Mylan India for avail Remedesivir injection Corona patient)

मायलन इंडियाकडून 4 हजार इंजेक्शन उपलब्ध

नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून ‘मायलन इंडीया’ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत. लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही ‘रेडेसिवीर ‘ इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे.

नितीन गडकरी यांचं ट्विट

नितीन गडकरी यांची सन फार्माशी चर्चा

नितीन गडकरी यांनी यापूर्वी‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते. ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोसचा पुरवठा नागपुरात झाला आहे. उर्वरित डोसेज लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

नागपूरमध्ये 58 हजार सक्रिय कोरोना रुग्ण

नागपूरमधील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 2 लाख 84 हजार 258 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 लाख 21 हजार 387 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 58 हजार 507 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 4 हजार 318 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

10 दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार

नागपूर जिल्ह्याचा देशातील  सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप टेनमध्ये समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये गेल्या 10 दिवसांपासून क्षमेतपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या:

व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन, नागपूरची विदारक स्थिती

नितीन गडकरींचा थेट फार्मा कंपनीच्या मालकाला फोन, नागपुरात एका झटक्यात 10 हजार इंजेक्शन

नागपुरात कोरोनाचा हाहा:कार का उडाला?; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं ‘हे’ कारण

(Nagpur Nitin Gadkari calls president of Mylan India for avail Remedesivir injection Corona patient)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....