Police action on Bullet | कर्कश आवाज, फॅन्सी नंबरप्लेट, 3 हजारपेक्षा जास्त बुलेटवर कारवाई

गेल्या काही दिवसांत 3 हजार पेक्षा जास्त बुलेटचालकांवर कारवाई केली आहे. बुलेटच्या आवाजाबाबत शहरात अनेक तक्रारी होत्या. (Police action on noisy bullet riders)

Police action on Bullet | कर्कश आवाज, फॅन्सी नंबरप्लेट, 3 हजारपेक्षा जास्त बुलेटवर कारवाई
traffic police action on bullet
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 2:08 PM

नागपूर : नागपूर पोलिसांनी बुलेट चालकांवर कारवाईची मोहिम सुरु केली आहे. कर्कश हॉर्न, मोठ्या आवाजाचा सायलेन्सर आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या बुलेटवर कारवाई सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांत 3 हजार पेक्षा जास्त बुलेटचालकांवर कारवाई केली आहे. बुलेटच्या आवाजाबाबत शहरात अनेक तक्रारी होत्या. (Police action on noisy bullet riders)

त्यामुळे नागपूर वाहतूक पोलिसांनी जास्त आवाजाचा सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाईची मोहिम सुरु केली. शहराच्या विविध भागात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 3 हजारपेक्षा जास्त बुलेट बहाद्दरांवर कारवाई केली.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात.

बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम…   

स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट शहरात वाढल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी नागपूर पोलीस विभागाला प्राप्त झाल्या.

राज्यात कधी कारवाई?

सध्या केवळ नागपूरमध्ये ही कारवाई दिसत असली, तरी राज्यभरात ही कारवाई होऊ शकते. कारण सर्वच जिल्ह्यांमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचं फॅड दिसतं. काही दिवसापूर्वी गोळी झाडल्याचा किंवा फटाका वाजल्याचा आवाज काढण्याचं बुलेटवाल्यांचा कारनामा सुरु होता. पोलिसांनी त्यावर कारवाई करुन त्याला जरब बसवली.

मात्र बेदरकारपणे बुलेट चालवून कर्कश हॉर्न वाजवत रपेट मारणाऱ्यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळेच जी मोहीम नागपूर पोलिसांनी हाती घेतली आहे, ती येत्या काळात राज्यभरात पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

मुंबईत वाहनजप्तीची कारवाई

इकडे मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. राज्य सरकारने दोन किमीच्या मर्यादेबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे गाड्या घेऊन बिनकामाचे फिरणाऱ्या हजारो गाड्या मुंबई पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

(Police action on noisy bullet riders)

संबंधित बातम्या 

बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम…   

बहिणीकडून भावाला बुलेट भेट, बहिणींना देण्यासाठी काहीच नसल्याने भावाची आत्महत्या 

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.