ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन अर्ज बंधनकारक, गावपुढाऱ्यांची कसोटी!

कोरोनाची पार्श्वभूमीवर लक्षात घेता ऑनलाईन प्रक्रिया गरजेची असली तरी त्यामुळे गावपातळीवरील पुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन अर्ज बंधनकारक, गावपुढाऱ्यांची कसोटी!
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:12 PM

नागपूर: राज्यातील 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. इच्छुकांना आपला उमेदवारी अर्ज आजपासून भरता येणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज ऑनलाईनच भरावा लागणार असल्यानं गावपुढाऱ्यांची चांगलीच कसोटी लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. तहसील कार्यालयावर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून ऑनलाईन अर्जाचा पर्याय निवडण्यात आला आहे. (Nagpur Gram Panchayat elections online form submission)

कोरोनाची पार्श्वभूमीवर लक्षात घेता ऑनलाईन प्रक्रिया गरजेची असली तरी त्यामुळे गावपातळीवरील पुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे. कारण, काही ठिकाणी ऑनलाईनची प्रक्रिया सोपी असली तरी काही गावांमध्ये इंटरनेटची योग्य सुविधाच नाही. त्यामुळे अशा गावांतील पुढाऱ्यांना आपल्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी शहर गाठणं गरजेचं बनलं आहे. दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसते, अशा गावांमध्ये ऑनलाईन अर्ज भरणं अवघड जाणार असल्याचं इच्छुक उमेदवार सांगतात.

नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हात एकूण 130 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण उमरेड तालुक्यातील काही गावांमध्ये पुढाऱ्यांना उमेदवारी अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं तिथले इच्छुक उमेदवार सांगतात.

उमेदवारी अर्ज भरताना काय काय हवे ?

1. उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केली असल्याचा जन्मतारखेचा पुरावा 2. अंतिम मतदार यादीत नाव असलेला उतारा 3. उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरवलेले नसावे 4. अपत्य किती आहेत याचे प्रमाणपत्र 5. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र 6. मालमत्ता आणि दायित्वाचे प्रमाणपत्र 7. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र 8. घरी शौचालय असून वापर करत असल्याचे हमीपत्र 9. राखीव जागांवरील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा 10. डिपॉझिटची रक्कम भरल्याचा पुरावा 11. महिला उमेदवारांनी माहेरचे जातप्रमाणपत्र असल्यास 100 रुपयांच्या बाँडवर शपथपत्र 12. टीसी किंवा सनद आदी शैक्षणिक पुरावे 13. आधार आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र 14. ग्रामसेवकांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र

2020-21 च्या निवडणुकीत कोणते दोन बदल ?

1. सरपंच-उपसरपंचाचे आरक्षण निकालानंतर होणार. 14 फेब्रुवारीच्या आत आरक्षण निश्चिती 2. राखीव जागांवरील उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती वा अर्ज केल्याचा पुरावा पुरेसा

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Nagpur Gram Panchayat elections online form submission

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.