गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांचा भाजपवर पलटवार; म्हणाले, पंतप्रधान ही व्यक्ती नव्हे तर…

Sanjay Raut on PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मनात कायमच आदर, पण...; संजय राऊत असं का म्हणाले? गुन्हा दाखल झाल्यावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले? अमित शाह यांच्या 'त्या' वक्तव्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच आपण मोदींवर वैयक्तिक रित्या टीका केली नसल्याचं राऊत म्हणालेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांचा भाजपवर पलटवार; म्हणाले, पंतप्रधान ही व्यक्ती नव्हे तर...
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 11:54 AM

नागपूर | 12 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्या प्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. देशाचं पंतप्रधानपद ही एक व्यक्ती नव्हे तर ती संस्था आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे. दोन दिवसांपूर्वी पंडित नेहरूवर टीका केली गेली आहे. या देशात आणीबाणी लावलेली नाही. टीका टिपण्णी होत राहणार आहे. राजकीय भूमिकांवर टीका करत असतील आणि त्यावर गुन्हे दाखल करून दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हा आणीबाणीचा लढा या विरोधातच होता. आमची टीका राजकीय भूमिकेच्या विरोधात असते, असं संजय राऊत म्हणालेत.

पंंतप्रधान मोदींविषयी राऊत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आमच्या मनात कायमच एक आदराची भावना राहिली आहे. त्यांच्यावर केली जाणारी टीका ही राजकीय असते. ती वैयक्तिक टीका नसते. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी 370 कलमावर बोलताना पंडीत नेहरू यांच्यावर टीका केली. मग आता कुणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

संजय राऊतांवर गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपचे नेते, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी तक्रार दिली होती. सामना या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप करत नितीन भुतडा यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153_A 505(2) आणि 124 – A नुसार खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे.

निरगुडेंच्या राजीनाम्यावर राऊत म्हणाले…

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायामूर्ती आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागासवर्गीय आयोगवर दबाव होता. त्यामुके अध्यक्षांनी राजीनामा दिला. 8 दिवस झाले राजीनामा देऊन, पण सरकार स्पष्टीकरण दिला नाही. यात लपविण्यासारखा काय आहे?, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.