Nagpur Sisters Death : नागपूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल

पीडित मीना कुटुंब मूळचे राजस्थान राज्यातील रहिवासी आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या ठिकाणी कामानिमित्ताने हे कुटुंब आले होते. मीना कुटुंबातील दोन चिमुकल्या मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला.

Nagpur Sisters Death : नागपूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होईल
नागपूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:54 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पाटण सावंगी परिसरात दोन चिमुकल्या मुलीं (Girls)चा संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. मुलींची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंब राजस्थानमधील असून कामानिमित्त नागपूरमध्ये राहत आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदना (Postmortem)साठी पाठवले आहेत. मुलींचा मृत्यू नेमका कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनी याबाबत सखोल तपास सुरु केला आहे. चिमुकल्यांच्या अचानक मृत्यूमुळे मीना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलींची अचानक तब्येत बिघडली, उपचारापूर्वीच मृ्त्यू

पीडित मीना कुटुंब मूळचे राजस्थान राज्यातील रहिवासी आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या ठिकाणी कामानिमित्ताने हे कुटुंब आले होते. मीना कुटुंबातील दोन चिमुकल्या मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला. दोन्ही मुलींची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून एका मुलीला मृत घोषित केलं तर दुसरीला नागपूरला हलविण्याचा सूचना केल्या. दुसऱ्या मुलीला नागपूरला हलवत असताना तिचाही रस्त्यातच मृत्यू झाला. साक्षी फुलसिंग मीना आणि राधिका फुलसिंग मिना या दोन्ही मुली मृत पावल्या. एकीचं वय तीन वर्ष तर दुसरीचा सहा वर्ष आहे. या मुलींना नेमकं झालं ? की कुणी घातपात केला ? याबाबत चर्चा सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी मशिन अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

पिपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरामध्ये फॅब्रिकेशन शॉपमध्ये अंगावर मोठी लोखंडी मशिन पडून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दुर्दैवी घटना कैद झाली आहे. मयत मुलगा आपल्या आईसोबत वाशिंग सेंटरमध्ये गाडी धुण्यासाठी आला होता. त्यादरम्यान मयत मुलाची आई ही वॉशिग सेंटरला लागून असलेल्या नीता फॅब्रिकेशन शॉपमध्ये बसली होती. त्याच फेब्रिकेशन शॉपमध्ये आईच्या शेजारी मुलगा देखील खेळत होता. त्यादरम्यान अचानक एक लोखंडी मशीन मुलाच्या अंगावर पडून पीडित मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Nagpur Suspicious death of two sisters, police begin investigation)

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.