AUDIO | साडेचार लाख घेऊनही बिलास नकार, नागपूरच्या डॉक्टरची ऑडिओ क्लीप व्हायरल
विम्स हॅास्पिटलचे डॉ. राजेश सिंघानिया यांनी कोरोनाग्रस्तावर उपचार करण्यासाठी साडेचार लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. (Nagpur VIMS Hospital Audio Clip)
नागपूर : नागपुरातील विम्स हॅास्पिटलच्या डॉक्टरांनी (VIMS Hospital) कोरोनावरील उपचारासाठी जास्त पैसे उकळल्याचा आरोप केला जात आहे. उपचारासाठी तब्बल साडेचार लाख रुपये वसूल करुन बिल देण्यास नकार दिल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. विम्सचे डॉ. राजेश सिंघानिया यांची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. (Nagpur VIMS Hospital Dr Rajesh Singhania allegedly denies bill Doctor Patient Phone Call Audio Clip goes Viral)
विम्स हॅास्पिटलचे डॉ. राजेश सिंघानिया यांनी कोरोनाग्रस्तावर उपचार करण्यासाठी साडेचार लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जयेश साखरकर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांत डॉक्टरांविरोधात तक्रार नोंदवली आहे. डॉक्टरांसोबत बिलाबाबत झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून त्यात डॉ. राजेश सिंघानिया यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. पोलीस आणि नागपूर महापालिका प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
काय आहे ऑडिओ क्लीप?
रुग्णाचा नातेवाईक : सर बिल हवे आहे डॉ. राजेश सिंघानिया : कितीचे बिल हवे आहे? तुम्हाला कुठून रिइम्बर्स्ट करायचे आहे रुग्णाचा नातेवाईक : सर, सीजीएचएसमधून डॉ. राजेश सिंघानिया : सीजीएचएसच्या फॉर्मेटमध्ये बिल हवे आहे का रुग्णाचा नातेवाईक : मी साडेचार लाख डिपॉझिट केले होते डॉ. राजेश सिंघानिया : ते तर पूर्ण झाले आहेत, 50 हजार सूट दिली आहे तुम्हाला. सीजीएचएसकडून पूर्ण साडेचार लाख तर तुम्हाला मिळणार नाहीयेत, मग त्यांच्याकडून जितके मिळणार असतील, तितक्याचं बिल देतो रुग्णाचा नातेवाईक : जितके पैसे दिले आहेत, तितकं बिल तर मिळायला हवं डॉ. राजेश सिंघानिया : बिल मिळणार नाही, हे तर आधीच सांगितलं होतं. रुग्णाचा नातेवाईक : तुम्ही सांगितलं होतं, की पाच लाख डिपॉझिट करा, नंतर जितके चार्जेस होतील, तितके भरत जा मला वाटलं मी प्रायव्हेट बेड बूक केला आहे. व्हेंटिलेटर बेड 25 हजार पर डे या हिशोबाने.. जे जास्तीचे पैसे होते. ते भरायला मी तयार होतो, फार्मसीचेही पैसे भरलेत डॉ. राजेश सिंघानिया : अतिरिक्त पैसे भरणार आहात का, पन्नास हजार द्या, तितकं बिल देतो रुग्णाचा नातेवाईक : मी फक्त जे पैसे भरलेत, त्याचं बिल मागतोय डॉ. राजेश सिंघानिया : बिल देऊ शकत नाही, म्हणून तर रोख घेतले रुग्णाचा नातेवाईक : हे चुकीचं आहे ना डॉ. राजेश सिंघानिया : चुकीचं तुम्हाला आता वाटत आहे, तेव्हा वाटलं नाही. तुम्हाला सीजीएचएसचे जितके रिएम्बर्स्ट होणार आहेत, तितकं मी अधिकृत बिल देतो. रुग्णाचा नातेवाईक : सर मी उधारी घेतली आहे, एक लाख वीस हजार फार्मसीचे दिले आहेत डॉ. राजेश सिंघानिया : ते तर कोव्हिड सेंटरला. त्यांनी बिल दिलं का, दिलं असेल तर टाका क्लेममध्ये रुग्णाचा नातेवाईक : मी भरलेल्या पैशांचं स्पष्टीकरण मला पाहिजे डॉ. राजेश सिंघानिया : ते देतो मी लिहून, व्हेंटिलेटर बेड रुग्णाचा नातेवाईक : बाहेर रेटकार्ड का लावलं आहे मग.. आयसीयू बेड 20 हजार, व्हेंटिलेटर बेड 25 हजार डॉ. राजेश सिंघानिया : व्हेंटिलेटर बेड लिहिलेलं नाही रुग्णाचा नातेवाईक : लिहिलंय सर डॉ. राजेश सिंघानिया : व्हेंटिलेटर बेड आमच्याकडे नाहीच तर कुठून लिहिणार डॉ. राजेश सिंघानिया : तुम्हाला पाच लाखांची रिसीट दिली होती का, तेव्हाच तुम्ही समजून जायला हवं होतं. मी आज बोललो, तुम्ही मला पाच लाख नाही दिलेत, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? दुसऱ्या रुग्णालयात जाऊन विचारा. तिथे तर जो पेशंट मरणार आहे, त्याचेही पाच लाख रुपये घेतात
ऐका ऑडिओ क्लीप :
संबंधित बातम्या :
बिलासाठी फोर्टिस रुग्णालयाचा आडमुठेपणा, नवी मुंबईतील नामांकित डॉक्टरचा मृतदेह देण्यास नकार
(Nagpur VIMS Hospital Dr Rajesh Singhania allegedly denies bill Doctor Patient Phone Call Audio Clip goes Viral)