नागपूरकरांनो सावधान! मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचे गृहमंत्र्यांचे आदेश
पोलिसांना उद्यापासून कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
नागपूर : नागपुरात आता मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे (Nagpur Without Mask Action). आता 200 रुपये ऐवजी 500 रुपये दंड आकाराला जाणार आहे. पोलिसांना उद्यापासून कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. नागपुरात वाढत असलेल्या कोरोना प्रकोप आणि मृत्यू संख्येवर पालकमंत्री नितीन राऊत आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला (Nagpur Without Mask Action).
नागपुरात लॉक डाऊन करण्यात यावा अशी मागणी होत होती. मात्र, पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात लॉकडाऊन केलं जाणार नाही, अस स्पष्ट केलं. बेड न मिळण्यासंदर्भात तक्रारी आहे, त्याचं नियोजन करण्यात येणार आहे. ऑक्सिजनची सध्या कमतरता नाही. मात्र, भविष्यात कमतरता निर्माण होईल त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. बेड उपलब्ध आहेत. मात्र, मॅनेजमेंटमध्ये कन्फ्युजन आहे. ते दूर करण्यात येत आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.
जम्बो हॉस्पिटल संदर्भात परवानगी घेतली आहे. मात्र, ते तयार करायला 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे. म्हणून जी व्यवस्था आहे, ती मजबूत केली जाईल, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. नागपुरात कोरोना मुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाय योजनेसाठी आज बैठक घेण्यात आली.
नागपूर शहरात वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असले, तरी अजून प्रशासनाला यश मिळताना दिसून येत नाही.
आम्ही कोणालाच बाहेर जायला सांगितले नाही, फक्त मुंबई-महाराष्ट्राला आपले म्हणा : संजय राऊतhttps://t.co/yEYTr3LjIy #SanjayRaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
Nagpur Without Mask Action
संबंधित बातम्या :
इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही,मग महाराष्ट्रातच का? मुख्यमंत्र्यांचा सवाल
महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार : उद्धव ठाकरे