Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Students | नागपुरात दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर; बसच्या काचा फोडण्याचे कारण काय?

नागपुरात 10 वी 12 वी ची परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मेडिकल चौकात काही विद्यार्थी एकत्रित येऊन घोषणाबाजी केली. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. काही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना शांत केलं.

Nagpur Students | नागपुरात दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर; बसच्या काचा फोडण्याचे कारण काय?
नागपुरातील मेडिकल चौकात आंदोलन करताना विद्यार्थी.
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 4:10 PM

नागपूर : राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा (Offline exam) घेणार या अफवेने नागपुरात विद्यार्थ्यांनी (Students in Nagpur) एकत्र येत आंदोलन केलं. नागपुरातील मेडिकल चौक (Medical Square) परिसरात अचानक विद्यार्थी एकत्र आले. ऑफलाईन परीक्षेविरोधात घोषणाबाजी सुरू केली. सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे, अशी अफवा हिंदुस्थानी भाऊ नामक तरुणाने पसरली होती. या विरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनं केलं होतं. त्यामुळे विद्यार्थी एकत्र आले. वर्षभर आमचा ऑनलाईन अभ्यास झाला. आमची लिहण्याची सवय तुटली. त्यामुळं ऑफलाईन परीक्षा घेतली तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळं एकतर परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन परीक्षा घ्यावी, अशी मागणी करत विद्यार्थी आक्रमक झाले होते. दरम्यान, एका शहर बसच्या काचा ही विद्यार्थ्यांनी फोडल्या. मात्र, पोलिसांनी वेळीच येत विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि त्यांना परत पाठवलं.

ऑनलाईन परीक्षा आयोजित करणे शक्य नाही

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्याचं मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र, राज्यातील दहावी बारावीचे विद्यार्थी या परीक्षांविरोधात आक्रमक झाले आहेत.

पालकांची अफवांवर विश्वास ठेऊ नये

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको अशी भूमिका विद्यार्थ्यांसोबत पालकांद्वारे मांडण्यात आली आहे. नागपूरमध्ये पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या मागणीला समर्थन दिलं आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

HSC SSC Exam : शिक्षण ऑनलाईन झालं, दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, कोल्हापूर नागपूरमध्ये विद्यार्थी पालकांचं आंदोलन

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्टीकरण

HSC SSC Exam Date | इयत्ता दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून परीक्षा सुरु होणार ?

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.