Nagpur | पतंग खेळताना अक्रित घडलं, 12 वर्षीय मुलाचा दुमजली इमारतीवरुन पाय घसरला अन्….

पतंग उडविताना दोन मजली इमारतीवरुन खाली पडून एका 12 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहित तरुण शाहू असं बालकाचं नाव असून रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Nagpur | पतंग खेळताना अक्रित घडलं, 12 वर्षीय मुलाचा दुमजली इमारतीवरुन पाय घसरला अन्....
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 8:55 AM

नागपूर : पतंग उडविताना दोन मजली इमारतीवरुन खाली पडून एका 12 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (Childred Death) झाल्याची घटना घडली. मोहित तरुण शाहू असं बालकाचं नाव असून रुग्णालयात (Hospital) दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संक्रांतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पंतग उडवले जातात. या काळात लहान मुलांनी स्वत:ची काळजी घेऊन पंतग उडवावे असा सल्ला दिला जातो. मात्र दरवर्षी अशा अनेक घटना घडतात. यात आता नागपुरात (Nagpur) दोन मजली इमारतीवरुन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. मोहित तरुण शाहू असं मृत मुलाचं नाव आहे.

अपघात नेमका कसा झाला ?

मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील पारडी परिसरातील भोले नगरात 12 वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे आई-वडील बांधकाम मजूर असल्यामुळे ते कामावर गेले होते. याच काळात घरी कोणीही नसल्यामुळे त्यांचा 12 वर्षीय मुलगा पंतग घेऊन दोन मजली इमारतीवर गेला. इमारतीवर जाऊन तो पतंग खेळत होता. याच दरम्यान पतंग खेळताना तो दुमजली इमारतीवरुन थेट खाली पडला. या दुर्घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला.

मुलाला रुग्णालयात दाखल केले 

मोहित तरुण शाहू असं मृत मुलाचे नाव आहे. हा मुलगा इमारतीवरुन खाली पडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लोकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत मुलाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर 

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे मृत मुलाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलगा बाहेर गेल्यानंतर तो काय खेळ खेळतोय. त्याच्यासोबत कोण आहे ? याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

Raigad Crime | धमकी देत रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 जण अटकेत, तिघे फरार

Palghar Crime | फेक अकाऊंट तयार करुन अश्लील फोटो मागवले, नंतर व्हायरल करण्याची धमकी, वसईत भामट्याला बेड्या

Mumbai Accident : फायर ब्रिगेडच्या मॉक ड्रिलदरम्यान विचित्र अपघात; माटुंग्यातील घटनेत 3 जवान गंभीर जखमी

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...