Nagpur Heatstroke | पूर्व विदर्भात उष्माघाताचे 13 मृत्यू, नागपुरात वाढत्या उन्हामुळं नागरिक हैराण
विदर्भात उष्णतेची लहर कायम आहे. काही भागात ढगाळलेलं वातावरण असलं तरी उष्णता काही कमी झाली नाही. त्यामुळं घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशीच परिस्थिती या संपूर्ण मे महिन्यात राहण्याची शक्यता आहे.
नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उष्माघाताच्या (Heatstroke) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ आहे. पूर्व विदर्भात 555 उष्णघाताचे रुग्ण सापडलेत. उष्माघातामुळं 13 मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) सर्वाधिक 6 मृत्यु तर नागपुरात 5 मृत्यूची नोंद करण्यात आलीय. 43 दिवसांत रुग्णसंख्येत 98 टक्क्यांनी वाढ झाली. वाढत्या उन्हामुळं नागरिक हैराण आहेत. नागपुरात काल 43.2 अंश डिग्री सेल्सीअस तापमान होतं. आकाश काही वेळा ढगाळलेलं होतं. पुढील दोन-तीन दिवस 43-44 अंश सेल्सिअसच्या जवळपास तापमान राहणार असल्याचा हवामान खात्याचा (Meteorological Department) अंदाज आहे.
अकोला 44.7, चंद्रपूर 44
विदर्भात उष्णतेची लहर कायम आहे. काही भागात ढगाळलेलं वातावरण असलं तरी उष्णता काही कमी झाली नाही. त्यामुळं घराबाहेर पडण कठीण झालं आहे. अशीच परिस्थिती या संपूर्ण मे महिन्यात राहण्याची शक्यता आहे. अकोला येथे काल 44.7 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं. काही भागात आकाश ढगाळलेलं होतं. असंच तापमान पुढील दोन-तीन दिवस राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. चंद्रपुरात काल तापमान 44 अंश डिग्री सेल्सिअस होतं. आज-उद्या जवळपास असंच तापमान राहणार आहे. उष्णतेची लाट कायम आहे. 17 मे रोजी चंद्रपुरात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय त्यानंतर दोन-तीन दिवस आकाश ढगाळलेलं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
गोंदियात अवकाळी पावसाचा फटका
निसर्गाच्या लहरीपणा भर उन्हाळ्यामध्येही सुरुच आहे. या आठवड्यात तापमानात वाढ झाल्याने गोंदिया जिल्ह्याचा पार 44 वर आला. जिल्हावासियांना होरपळून निघाले असताना उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या गोंदियाकरांना आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आहे. काल सायंकाळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. थोडा का होईना नागरिकांना उकाड्या पासून थोडा फार दिलासा मिळाला आहे.