Nagpur Snake | दिघोरीत निघाले सापाचे 15 पिल्लू, बिनविषारी असल्याने सुटकेचा निःश्वास
साप म्हटलं की बहुतेकांच्या अंगावर काटा येतो. एक दोन नव्हे तब्बल 15 सापांचे पिल्लू सापडले. त्यामुळं भीती निर्माण झाली होती. पण, ते साप विषारी नसल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं. तेव्हा कुठं बंडू सहारे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नागपूर : नागपूरच्या दिघोरी (Dighori) परिसरातील बंडू सहारे (Bandu Sahare) यांच्या अंगणात सुरुवातीला एक सापाचे पिल्लू दिसून आलं. या पिल्लूच्या पाठोपाठ आणखी 15 पिल्लू दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बंडू सहारे यांनी सर्पमित्र अंकित खलोडे यांना संपर्क साधला. अंकित खालोडे यांनी सापाचे पिल्लू कुठून येत असेल, याचा शोध घेतला. अंगणातील भिंतीजवळ एक बिळ असल्याचं आढळलं. बिळाची पाहणी केली असता त्याला त्यामध्ये सापाची फुटलेली अंडी दिसली. त्यावरून ही सर्व पिल्लू त्याच अंड्यातून निघाले असल्याचा चा निष्कर्ष काढण्यात आला. चेकर कीलबॅक असे या सापांचे शास्त्रीय नाव आहे. नागपूरमध्ये या सापाला धोंडा म्हणून ओळखला जातो. नागपूरसह विदर्भात सर्व ठिकाणी हा साप आढळतो. हा साप बिनविषारी (Non-venomous) असल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं. सापाची 15 पिल्लं मिळून आल्याने परिसरात एकच चर्चा झाली होती. त्यामुळे नागरिकांनी पिल्लांना पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील केली होती. सर्पमित्राने या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.
अंगावर उभे राहिले काटे
बंडू सहारे हे दिघोरीत राहतात. त्यांच्या घरी एक साप दिसलं. ते छोटसं पिल्लू होतं. त्यामुळं त्याकडं विशेष लक्ष ठेवण्यात आलं. पाहतात तर काय ते एकटचं नव्हतं. त्या पिल्लावर लक्ष ठेवण्यात आल्यावर तो एका छिद्रात जाताना दिसला. त्या छिद्रावर नजर ठेवण्यात आली. बघतात तर काय त्याठिकाणी खूप सारे सापाचे पिल्लू होते. साप म्हटलं की बहुतेकांच्या अंगावर काटा येतो. एक दोन नव्हे तब्बल 15 सापांचे पिल्लू सापडले. त्यामुळं भीती निर्माण झाली होती. पण, ते साप विषारी नसल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं. तेव्हा कुठं बंडू सहारे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले
या सापंना पाहिल्यानंतर आधी सर्पमित्रांची आठवण झाली. त्यांनी सर्पमित्रांना फोन केला. ते लगेच आले. पिल्लू पकडण्यात आले. त्या पिल्लांना एका बरणीत भरण्यात आले. त्यांना सोडल्यानंतर ते पुन्हा छिद्राच्या दिशेने जात होते. ही पिल्लं पाण्यासाठी बरीच गर्दी जमली. ते बिनविषारी असल्याचं कळताच मुलांची भीती दूर झाली. त्यांनी जवळून सापाची छोटी-छोटी पिल्लं बघीतली.
Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी