Nagpur Crime | 16 वर्षीय मुलीचे आई-वडील विभक्त, आजी-आजोबांचा बोहल्यावर चढविण्याचा बेत, नागपुरात बालविवाह रोखण्यात यश
नागपुरात सोळा वर्षीय मुलीचे लग्न मध्य प्रदेशातील मुलासोबत ठरविले होते. मुलीचे आई-वडील विभक्त असल्यानं मुलगी आजोबांकडे राहत होती. त्यांनी तिची दहावीची परीक्षा झाल्यावर लग्नाच्या बोहल्यावर चढविण्याचा बेत आखला. पण, बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी हा बालविवार रोखला.
नागपूर : जिल्ह्यात पुन्हा एका बालविवाहाचा प्रयत्न थांबवला. दहावीची परीक्षा होताच सोळा वर्षांच्या नातीचं लग्न लावण्याचा डाव होता. आजी- आजोबा मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) तरुणासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न लावणार होते. नागपुरातील जरीपटका भागात लग्नाचा बेत होता. बाल संरक्षण अधिकाऱ्यांने (Child Protection Officer) अल्पवयीन मुलाचा विवाह थांबवला. आई वडील विभक्त असल्याने मुलगी आजी- आजोबांसोबत राहत होती. बाल संरक्षण कक्षाने गेल्या दीड वर्षात नागपूर जिल्ह्यातील पंधरा बालविवाह थांबवले. आई, वडील विभक्त असल्याने मुलगी आजी-आजोबांकडे राहत होती. अल्पवयीन या सोळा वर्षीय मुलीने दहावीची परीक्षाही (Tenth Exam) दिली. परंतु हे सर्व होत असताना तिचा या कोवळ्या वयात विवाह करण्यात येणार होता.
आजी-आजोबांना समज
नागपुरात सोळा वर्षीय मुलीचे लग्न मध्य प्रदेशातील मुलासोबत ठरविले होते. मुलीचे आई-वडील विभक्त असल्यानं मुलगी आजोबांकडे राहत होती. त्यांनी तिची दहावीची परीक्षा झाल्यावर लग्नाच्या बोहल्यावर चढविण्याचा बेत आखला. पण, बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी हा बालविवार रोखला. शुक्रवारी, २२ एप्रिल रोजी तिचा मध्यप्रदेशातील एका मुलासोबत बालविवाह होणार होता. परंतु वेळीच माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाल्यानंतर पथकाने प्रतिबंधात्मक कारवाई करून बालविवाह रोखला. पीडित सोळा वर्षीय मुलगी ही जरीपटका भागात आजी-आजोबांकडे राहते. मुलगी सज्ञान होईपर्यंत लग्न करू नये, अशी समज आजी-आजोबांना देण्यात आली.
यांनी केली कारवाई
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, विनोद शेंडे, साधना ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली फटींग, मुख्य सेविका दीपाली पवार, सारिका बारापात्रे, अंगणवाडी सेविका स्नेहलता गजभिये, वनिता नंदेश्वर आदी सहभागी होते.