Nagpur Crime | 17 वर्षीय मुलगी पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात!

नागपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एक 17 वर्षीय मुलगी गर्भवती होती. पाच महिने झाल्यानंतर ही बाब तिच्या लक्षात आली. त्यानंतर तिने युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात केला. पण, प्रकृती खराब झाल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

Nagpur Crime | 17 वर्षीय मुलगी पाच महिन्यांची गर्भवती, युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात!
एमआयडीसी पोलीस हद्दीत युवक काम करतो. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 9:30 AM

नागपूर : नागपूर तालुक्यातील एका गावातलं हे प्रकरण आहे. सतरा वर्षीय मुलीचे एका 27 वर्षीय युवकासोबत सूत जुळलं. दोन वर्षांपासून त्याचं प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी तो युवक नागपुरात कामानिमित्त आला. एमआयडीसी (MIDC) परिसरात भाड्याने खोली करून राहू लागला. त्यामुळं त्यांच्या भेटीगोटी कमी झाल्या. पण, तरीही ते संधी मिळेल तेव्हा भेटत होते. कधी-कधी हा युवक नरखेडला (Narkhed) जात असे, तर कधी-कधी ती नागपूरला येत असे. काही दिवसांपूर्वी ती नागपूरला आली. रात्री त्याच्या खोलीवर थांबली. दोन-तीन दिवस ती इकडं थांबली होती. त्यावेळी त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण जाले. यातून तिला गर्भधारणा (Pregnancy) झाली. मळमळ, उलटीचा तिला त्रास होऊ लागला.

गर्भपात करण्यासाठी पाहिले व्हिडीओ

ही बाब मुलीच्या लक्षात आल्यानंतर तीनं युवकाला सांगितलं. तो रुग्णालयात काम करत असल्यानं त्यानं काही औषधी तिला सांगितली. तिने ती औषध खाल्ली पण, काही परिणाम झाला नाही. चार-पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर ती हादरली. आता काय करावे तिला काही सुचेना. गर्भपात कसा करतात. यासाठी तिनं युट्युबवर काही व्हिडीओ पाहिले.

काढा पिऊन मुलगी बेशुद्ध

त्यात मुलीला काही गावरानी औषधांची माहिती मिळाली. तिला काढा तयार केली. तो घेतला. त्यामुळं तिचा गर्भपात झाला. घरी मुलगी बेशुद्ध पडली होती. बाजूला चार-पाच महिन्यांचे अर्भक होते. पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तिला मेडिकलमध्ये दाखल केले. नागपूर ग्रामीण पोलिसांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. युवकाविरोधात पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण आता एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केले. पोलीस तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

Nagpur Election | शिवसेना, राष्ट्रवादीची युती होणार का? सत्तेसाठी कॉंग्रेसचा लागणार कस

Nagpur Temperature | सूर्य आग ओकतोय, उन्हामुळे वाढले त्वचारोग; कशी घ्याल काळजी?

Wardha Crime | वायफडच्या सरपंचाला मारहाण; दगडाने फोडले डोके, वादाचे कारण काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.