Special Report : 4 दिवसांत 3 एसआयटी चौकशीचे आदेश, प्रकरण पोहचलं मंदाकिनी एकनाथ खडसेंपर्यंत

सूडबुद्धीनं एकमेकांच उट्ट काढलं जात आहे. एसआयटी नेमल्यानं काही फरक पडत नसल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.

Special Report : 4 दिवसांत 3 एसआयटी चौकशीचे आदेश, प्रकरण पोहचलं मंदाकिनी एकनाथ खडसेंपर्यंत
एकनाथ व मंदाकिनी खडसे
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 11:12 PM

मुंबई : गेल्या चार दिवसांत तीन एसआयटी चौकशीची आदेश जारी करण्यात आलेत. त्यातच चौकशीचं सत्र मंदाकिनी एकनाथ खडसे यांच्यापर्यंत आलंय. मंदाकिनी खडसे यांनी गौण खनिजामध्ये ४०० कोटींचा महसूल बुडवला असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिलेत. चंद्रकांत पाटील म्हणाले, एखाद्या व्यक्तीनं पाच ब्रास उचलले तरी त्याच्यावर लाखो रुपयांचा दंडाचा बोजा येतो. गुन्हे दाखल केले जातात. जेलमध्ये टाकलं जातं. 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. सरकार कोणाच्या दबावाखाली काम करते का. तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आठ दिवसांत सर्व परवानग्या दिल्या आहेत. एसआयटी चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल. सर्वसामान्य माणसाला जो न्याय मिळतो तो इथं मिळाला पाहिजे, असंही पाटील यांनी सांगितलं.

त्यावर महसुलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील म्हणाले, मुक्ताईनगरच्या उपविभागीय अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. याची चौकशी करावी. गैरमार्गानं काही झालं असेल तर जबाबदारी निश्चित करावी. यावर योग्य ती कारवाई अहवाल आल्यानंतर करण्यात येईल.

गेल्या चार दिवसांत तीन एसआयटीची चौकशी लागली. दिशा सालियान प्रकरणात एयू कोण आहे. यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यानंतर एसआयटीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर ठाकरे गटानं विधान परिषदेत आपला मोर्चा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडं वळविला. त्यानंतर तरुणीच्या बलात्काराच्या आरोपाची चौकशी करण्याची घोषणा सभापती निलम गोऱ्हे यांनी केली.

त्यानंतर आता मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात एसआयटीची चौकशी लावण्यात आली. यावर एकनाथ खडसे म्हणाले, मला असं वाटतं की सभागृहामधील चर्चेची पातळी खालावली आहे. सूडबुद्धीनं एकमेकांच उट्ट काढलं जात आहे. एसआयटी नेमल्यानं काही फरक पडत नसल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.