Nagpur | 40 वर्षीय चौकीदाराचा जळून मृत्यू, मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला; मृत्यूचे कारण काय?

चौकीदार काळबांडे हे चौकीदारी करतात. संध्याकाळी त्यांनी थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून शेकोटी पेटविली. शिवाय शॉलही गुंडाळली होती. परंतु, ते झोपेत असताना शॉलनं पेट घेतला असावा. त्यामुळं ती आग त्यांच्यापर्यंत पोहचली असावी.

Nagpur | 40 वर्षीय चौकीदाराचा जळून मृत्यू, मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला; मृत्यूचे कारण काय?
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 3:32 PM

नागपूर : थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून शहरवासी ठिकठिकाणी शेकोड्या पेटवितात. शेकोटी पेटवून जवळ असलेल्या एका चौकादाराचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला. या चौकीदाराचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळं त्यांचा मृत्यू कसा झाला हे गूढ अद्याप कायम आहे.

चौकीच्या आतील साहित्यही जळाले

रवींद्र काळबांडे असं या चौकीदाराचं नाव आहे. कळमेश्वर मार्गावर गोरेवाडा वनक्षेत्रात रात्र पाळीतील रवींद्र कामावर होते. थंडीचे दिवस असल्यानं त्यांनी चौकीच्या आत शेकोटी पेटविली. त्या शेकोटीजवळच त्यांचा मृतदेह सापडला. चौकीच्या आतील साहित्यही जळालेले आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

मृत्यू नेमका कशामुळं

रवींद्र काळबांडे यांचा मृत्यू हा नेमका कशामुळं झाला हे अद्याप स्पष्ट सांगता येत नाही. पण, शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जीव गेला असावा. किंवा भाजून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. थंडी असल्यामुळं शक्य होईल, ते लोकं शेकोटी पेटवितात. तिचा सहारा घेतात.

अशी घडली घटना

चौकीदार काळबांडे हे चौकीदारी करतात. संध्याकाळी त्यांनी थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून शेकोटी पेटविली. शिवाय शॉलही गुंडाळली होती. परंतु, ते झोपेत असताना शॉलनं पेट घेतला असावा. त्यामुळं ती आग त्यांच्यापर्यंत पोहचली असावी. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Sarangkheda| आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी…मधुलिका कुलीन रुबीची उंची 63 इंच, किंमत 33 लाख…!

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

Nagpur Corona | आधी दहावीची विद्यार्थिनी, आता अकरावीची कोरोनाबाधित, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण, शाळा सुरू राहणार?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.