गोंदियातील 5 कलाकारांची फॅशन शो आणि डॉन्स स्पर्धेमध्ये बाजी, विनर झालेल्या कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी
गोंदियातील 5 कलाकारांनी फॅशन शो आणि डॉन्स स्पर्धेमध्ये बाजी मारली. विनर झालेल्या कलाकारांना पाखी चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईत विनर झालेल्या कलाकारांचा गोंदियात सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत देशातील 1300 कलाकार सहभागी झाले होते.
गोंदिया : गोंदियातील प्रयास इंटरटेनमेंट आणि मुंबई येथील फॅशन हब यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत फॅशन शो आणि डॉन्स कॉम्पिटेशन झाली. यामध्ये गोंदियातील 5 कलाकारांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल प्रयास इंटरटेनमेंटच्या वतीनं विजयी कलाकारांचा गोंदियात सत्कार करण्यात आला.
गोंदियातील 5 कलाकारांनी फॅशन शो आणि डॉन्स स्पर्धेमध्ये बाजी मारली. विनर झालेल्या कलाकारांना पाखी चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईत विनर झालेल्या कलाकारांचा गोंदियात सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत देशातील 1300 कलाकार सहभागी झाले होते.
अरशद खानच्या लावणीला मिळाली दाद
आदिवासी बहुल भागातील तसेच झाडीपट्ट्टीतील कलावंत तसेच कलाकारांना मुंबईसारख्या ठिकाणी चमक दाखविली. आपली कलाकृती दाखविता यावी, यासाठी प्रयास इंटरटेनटमेंट आणि फॅशन हब मुंबई यांनी कलाकारांना मोठ्या पाडद्यावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मुंबईत फॅशन शो तसेच डॉन्स कॉम्पिटेशन्सचे आयोजन केले होते. यामध्ये देशाच्या विविध राज्यातील 1300 कलाकारांनी सहभाग नोंदविला होता. गोंदिया जिल्ह्यातील अरशद खान पठाण या तरुणानं लावणी तसेच फॅशन शो स्पर्धेत भाग घेत प्रथम पुरस्कार पटकविला. तर आमगाव तालुक्यातील सिद्धी क्षीरसागर या तरुणीनं द्वितीय क्रमांक पटकाविला.
प्रयास इंटरटेनटमेंटचा प्रयास
गोंदियातील कृतिका अग्रवाल या तरुणीनं फॅशन शो स्पर्धेत द्वितीय स्थान पटकाविले. मध्य प्रदेश राज्याच्या कटनी जिल्ह्यातील साक्षी पांडे या तरुणीनं ओडिसी म्हणजेच भरत नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर नागपूर येथील हर्ष पित्रोदा, रोशन कुमार, मुकेश कुमार या तरुणानं लहान मुलांच्या डॉन्स स्पर्धेत भाग घेत स्थान मिळविले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम तसेच गोवा आणि थायलंडचा मोफत पॅकेज देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबई येथून तयार होणाऱ्या पाखी चित्रपटात काम करण्याची संधी देखील या विजयी कलाकारांना मिळणार आहे. कलाकारांनी प्रयास इंटरटेनटमेंट आणि फॅशन हब मुंबईचे आभार मानले. अशाच पद्धतीनं जर झाडीपट्टीतील कलाकारांना मोठे प्लॅट फॉर्म मिळाले तर मोठ्या पडद्यावर यश गाठायला वेळ लागणार नाही असे मत व्यक्त केले.