NMC Budget | नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा एका क्लिकवर…
नागपूरचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B.) यांनी प्रशासक म्हणून महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. 2022-23 चा हा अर्थसंकल्प आहे. मनपाच्या प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. मनपाच्या स्वतःच्या उत्पन्नात भरीव वाढ अपेक्षित आहे, असं मनपा आयुक्त (Municipal Commissioner) म्हणाले.
नागपूर मनपाचा अर्थसंकल्पImage Credit source: tv 9
Follow us
सार्वजनिक बांधकाम विभाग शहर सिमेंट काँक्रिट रस्ते टप्पा दोन व तीन राबविण्यात येत आहे. टप्पा दोनमध्ये 324 कोटी रुपयांचे प्रकल्प आहेत. रस्त्यांची लांबी 55 किलोमीटर आहे. यापैकी 54 रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. 49 किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेत. टप्पा तीनमध्ये 301 कोटी रुपये खर्च 39 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर होणार आहे. यापैकी सरकार व नासुप्र यांच्या सहभागातून 125 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
नागपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित करणे आवश्यक आहे. पायी चालण्यासाठी मनपा आधुनिक पायी रस्ते तयार करत आहे. 2022-23 च्या प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार, दहा कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. वाक कॉरिडोरसाठी पाच रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.
महालच्या बुधवार बाजार केळीबाग रोड येथे अत्याधुनिक व्यावसायिक संकुल शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम भाडेतत्वावर करण्यात येणार आहे. 24 हजार 967 चौरस मीटर बांधकामाचे क्षेत्र आहे. तळमजला व नऊ मजली इमारत उभी राहणार आहे.
शहरातील रस्ते खड्डे विरहित ठेवण्यासाठी हॉट मिक्स प्लाँटद्वारे रस्ते दुरुस्ती सुरू राहते. क्षतीग्रस्त रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 1 हजार 630 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच व्हाईट टॉपिंग रस्ते तयार करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दोन प्रमुख रस्त्यांसाठी दोन हजार 400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. व्हेटरनरी कॉलेज ते मोठा हनुमान रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, फुटपाथ व ड्रेनसह सहाशे मीटर लांब व 24 मीटर रुंद रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच चिंचभवन घाट ते चिंचभवन सीमेपर्यंत दोन हजार 400 मीटर लांबीचा व 30 मीटर रुंदीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे.