Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे अनाथ झाली 79 बालकं, पंतप्रधानांनी साधला संवाद, 15 लाखांच्या पॅकेजचे वितरण

तत्पूर्वी पंतप्रधानांनी आपल्या भावपूर्ण निवेदनात बालकांना तुमच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. मात्र ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आला. त्यानाच मोठे होता आले. त्यामुळे हार न मानता लढण्याचे आवाहन केले. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सेवा हेच कर्म मागणाऱ्या शासनाची ही भावनिक पूर्तता असल्याचे सांगितले.

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे अनाथ झाली 79 बालकं, पंतप्रधानांनी साधला संवाद, 15 लाखांच्या पॅकेजचे वितरण
15 लाखांच्या पॅकेजचे वितरण
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:48 PM

नागपूर : तुमच्या आयुष्यात झालेली दुर्घटना जीवनात अंध:कार निर्माण करणारी आहे. मात्र यातून सकारात्मक वृत्तीने बाहेर पडणे आवश्यक आहे. शासन तुमच्या कायम पाठीशी आहे. निराश न होता पुढील मार्गक्रमण करा, आकाशी झेप घ्या, असे भावनिक आवाहन केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. कोरोना महामारीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्युमुखी पडले अशा अनाथ बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत ऑनलाईन संवाद साधला. जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयातील बचत भवनात जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) मार्गदर्शनात महिला व बाल कल्याण विभागाने (Department of Women and Child Welfare) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील अनाथ बालकांशी गडकरी यांनी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 79 आहे. त्यांना आज जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखांचे पॅकेज मंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर.विमला, महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त रवी पाटील उपस्थित होते.

दु:खाची भरपाई होऊ शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय जिव्हाळ्यातून ही योजना आणली आहे. मुलांना त्यांच्यासोबत घडलेल्या अघटीतातून बाहेर काढण्यासाठी, निराशेतून प्रकाशाकडे नेण्यासाठी, संकटावर मात करुन यशस्वी होण्यासाठी, अतिशय बारकाईने ही योजना आखण्यात आली. कोणत्याच निराधाराला शासन दुर्लक्षित करणार नाही. त्यामुळे मुलांनी सकारात्मक वृत्तीने आपल्या आयुष्याचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी आपल्या भावपूर्ण निवेदनात बालकांना तुमच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. मात्र ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आला. त्यानाच मोठे होता आले. त्यामुळे हार न मानता लढण्याचे आवाहन केले. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सेवा हेच कर्म मागणाऱ्या शासनाची ही भावनिक पूर्तता असल्याचे सांगितले.

वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड

कोरोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून भरला जाणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.