Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC school | दहावीत नागपूर मनपाचा 99.31 टक्के निकाल, 22 शाळांचा निकाल शंभर टक्के, मनपातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

मासूम संस्थांच्या सहकार्याने मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात मोठी मदत मिळाली. मनपातर्फे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपये आणि सुवर्ण पदक, द्वितीय येणाऱ्याला 15 हजार रुपये आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांची सांगितले.

NMC school | दहावीत नागपूर मनपाचा 99.31 टक्के निकाल, 22 शाळांचा निकाल शंभर टक्के, मनपातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
मनपातर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 10:09 AM

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर महापालिकेच्या शाळांनी मोठी झेप घेतली. मनपाच्या शाळांचा यंदाचा निकाल 99.31 टक्के एवढा आहे. महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवला. हिंदी माध्यमाचा निकाल 98.45 टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल 99.77 टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 99.31 टक्के लागला. दहावीच्या परीक्षेत (10th standard examination) प्रावीण्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शुक्रवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे(Chinmay Gotamare), मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपकुमार मीना, राम जोशी आणि शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर (Preeti Mishrikotkar) यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रगती मेश्राम चारही माध्यमातून प्रथम

जयताळा मराठी माध्यम शाळेची विद्यार्थिनी प्रगती धुरेंद्र मेश्राम हिने मराठी, हिंदी उर्दू आणि इंग्रजी या चारही माध्यमातून आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून 92.60 टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मन पटकाविला. विवेकानंद नगर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी बरखा सुनील साहू हिने 89.20 टक्के गुण प्राप्त केले. हिंदी माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. उर्दू माध्यमातून कामगारनगर उर्दू माध्यमिक शाळेची महेक खान कय्युम खान हिने 90.80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. इंग्रजी माध्यमातून जी. एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी आफरीन सदफ इरशद 90.60 गुण प्राप्त करून प्रथम आली. दिव्यांग विद्यार्थ्यांमधून बुशरा हबीब खान जी.एम. बनातवाला मनपा इंग्रजी शाळेची विद्यार्थिनी प्रथम ठरली आहे.

चारही माध्यमांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या मुलीचं

मराठी माध्यमातून दुर्गानगर माध्यमिक शाळेची सह्याद्री प्रवीण भुसारी 92. 40 टक्के घेऊन द्वितीय आणि राममनोहर लोहिया शाळेची धनश्री राजेंद्र भेंडारकर 91 टक्के घेऊन तृतीय राहिली आहे. हिंदी माध्यमातून विवेकानंदनगर शाळेची साधना राजू वर्मा 88 टक्के घेऊन द्वितीय आणि ममता पुरुषोत्तम वर्मा 86.40 टक्के घेऊन तृतीय क्रमांकावर आहे. उर्दू माध्यमातून ताजबाग उर्दू माध्यमिक शाळेची नुजहत परवीन मो. अब्दुल जमील 90. 20 टक्के घेऊन द्वितीय आणि गंजीपेठ उर्दू माध्यमिक शाळेची राबिया परवीन अब्दुल कादिर 89.80 टक्के घेऊन तृतीय राहिली. इंग्रजी माध्यमातून जी.एम. बनातवाला शाळेची सना परवीन इरशद 85.04 टक्के घेऊन द्वितीय आणि बुशरा हबीब खान 81.08 टक्के घेऊन तृतीय ठरली आहे. चारही माध्यमांमध्ये प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणा-या सर्व मुलीच आहेत.

हे सुद्धा वाचा

158 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त

मनपा आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमाने मनपाच्या सहा शाळांना स्मार्ट शाळा बनविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास गोतमारे यांनी व्यक्त केला. शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी मनपा शाळांच्या निकालाबद्दल सांगितले की, मनपा शाळांचा निकाल 99.31 टक्के लागला. मराठी शाळांचा 100 टक्के, हिंदीच्या 6 शाळांचा 100 टक्के, उर्दूच्या 8 शाळांचा निकाल 100 टक्के आणि इंग्रजी शाळाचा निकाल हा सुद्धा 99 टक्के लागला आहे. मनपाच्या सर्व शाळांमधून 1456 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1446 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 158 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त आहेत. 901 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 365 द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. 22 शाळांचा निकाल 100 टक्के आला असून 90 टक्क्याच्यावर 7 शाळांचा निकाल लागला.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.