Nagpur Crime | हुडकेश्वरातील पोलीस उपनिरीक्षकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार

इन्स्टाग्रामवर ओळख झाली. पोलीस उपनिरीक्षकाने मुलीवर अत्याचार केलेत. त्यातून ती दोन वेळा गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर तिने त्याला लग्नाची गळ घातली. पण, त्याने लग्नासाठी नकार दिला. पीडितेने त्याच्या विरोधात कपिलनगर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अक्षय ठाकरे (वय 26) असे आरोपी पीएसआयचे नाव आहे. तो हुडकेश्‍वर येथे कार्यरत असल्याचे सांगण्यात येतंय.

Nagpur Crime | हुडकेश्वरातील पोलीस उपनिरीक्षकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार
हुडकेश्वरच्या पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याची घटना कपिलनगर ठाण्याच्या हद्दीत घडली.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 2:21 PM

नागपूर : सोशल मीडियाच्या जगतात अक्षय ठाकरेची (Akshay Thackeray) पीडितेसोबत इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झाली. अक्षयने पीडितेला रिक्वेस्ट पाठविल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) बोलणे सुरू झाले. त्यानंतर अक्षयने तो पीएसआय असल्याचं तिला सांगितलं. ओळख मैत्रीत बदलली. अक्षयने पीडितेकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाले. मैत्री आणखीच वाढली. त्यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले. पीडिता ही एकटीच राहते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, अक्षय 8 मे 2021 रोजी पीडितेला भेटायला आला. त्यानंतर तो तिच्या घरी गेला. ते दोघेही घरी गप्पा मारत बसले. त्यानंतर तो निघून गेला. 22 मे 2021 रोजी रात्री साडेदहा वाजता अक्षय हा पीडितेच्या घरी आला. यावेळी त्याने तिच्याकडे जेवण केले. नंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. आपण लवकरच लग्न करू, असेही म्हणत अक्षयने तिचा विश्‍वास संपादन केला.

दोघेही जायचे फिरायला

पीडितेशी शारीरिक सबंध प्रस्थापित केल्यानंतर पहाटे पाच वाजताच्या सुमारास निघून गेला. यानंतर दोघांचेही व्हॉट्सअॅपवर चॅट आणि व्हिडीओ कॉलवरून बोलणे सुरू होते. यानंतर अक्षय हा नेहमी पीडितेच्या घरी यायचा. तो तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. पीडिता आणि अक्षय हे दोघेही शहराबाहेर अन्यत्र ठिकाणी फिरायलाही गेलेत. तो हा पीडितेच्या मित्रांनाही भेटला. जानेवारी 2022 मध्ये पीडितेला ती गरोदर असल्याचे कळले. तिने अक्षयला याची माहिती दिली. यावेळी त्याने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. तिने तिला एक मेडिसीन खायला दिली. त्यानंतर तो सलग पाच ते सहा दिवस तिच्या घरी थांबून होता.

लग्नास नकार दिल्याने गुन्हा

अक्षयने तिला गायनॉक्लॉजिस्टकडे आणले आणि तिची सोनोग्राफी केली. यात तिचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले. त्यानंतर अक्षय पुन्हा तिच्या घरी सतत याचा आणि शारीरिक संबंध ठेवायचा. तिने नकार दिला तर तो तिला मारझोड देखील करायचा. 6 मार्च 2022 पीडिता पुन्हा गरोदर राहिली. 9 मार्च रोजी तिने यासंदर्भात अक्षयला माहिती दिली. तिने अक्षयला लग्नाची गळ घातली. त्याच्या घरी याबाबत सांग असेही सांगितले. त्यांच्या दोघातील संबंधाची माहिती अक्षयच्या भावालाही होती. तो लग्नाला टाळाटाळ करीत होता. शेवटी पीडितेने कपिलनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अक्षय ठाकरे विरोधात गुन्हा दाखल केला. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

Satish Uke ED Raid : फडणवीसांचा विरोध, पटोलेंशी जवळीक, राऊतांची भेट, सतीश उकेंना नेमकं काय काय भोवलं?

Who is Satish Uke: कोण आहेत नागपुरचे सतीश उके ज्यांच्यावर ED ने धाड टाकलीय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.