हल्लेखोर पेट्रोल पंप कार्यालयात शिरतात, पंप मालकावर सपासप वार करतात, पैसे घेऊन पसार होतात

दिलीप सोनटक्के यांचा भीवापूर येथील राष्ट्रीय मार्गावर पेट्रोलपंप होता.नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता दिलीप सोनटक्के हे पेट्रोलपंपावर आले. त्यानंतर दुचाकीने आलेल्या तीन जणांनी कार्यालयात हल्ला चढवला.

हल्लेखोर पेट्रोल पंप कार्यालयात शिरतात, पंप मालकावर सपासप वार करतात, पैसे घेऊन पसार होतात
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 3:34 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यात पेट्रोलपंप मालकाची हत्या करण्यात आली. दिवसाढव्या दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. तीन आरोपींनी शिरून हत्या केली होती. त्याचा सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आला आहे. दोन दिवसांपूर्वी भरदिवसा तीन आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करून केली हत्या होती. ती कशाप्रकारे हत्या केली होती, त्याचा cctv समोर आला आहे.

पंपमालकाला मारहाण

दिलीप सोनटक्के असे पेट्रोल पंप मालकाचे नाव आहे. दिलीप सोनटक्के यांची हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोर अचानक पेट्रोल पंपातमधील ऑफिसमध्ये शिरतात. पेट्रोल पंप मालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात. नंतर चाकूने सपासप वार करून तेथून पैसे घेऊन पसार होतात. हत्येनंतर पेट्रोल पंपाच्या तिजोरीत असलेले दोन लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले होते. ही हत्या पैशासाठी केली असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.

हे सुद्धा वाचा

कर्मचाऱ्यांना दाखवला बंदुकीचा धाक

भिवापूर येथील पेट्रोल पंपावर मालक हिशोब घेत होते. तीन बंदुकधारी व्यक्ती दुचाकीने आले. सुरुवातीला पंप मालकाला मारहाण करून त्यानंतर चाकूने हत्या करण्यात आली. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हा थरार सुमारे दहा ते १५ मिनिटे सुरू होता.

कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला

दिघोरी येथील दिलीप सोनटक्के असं मृतकाचे नाव आहे. दिलीप सोनटक्के यांचा भीवापूर येथील राष्ट्रीय मार्गावर पेट्रोलपंप होता.नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता दिलीप सोनटक्के हे पेट्रोलपंपावर आले. त्यानंतर दुचाकीने आलेल्या तीन जणांनी कार्यालयात हल्ला चढवला. त्यानंतर आरोपींनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पळ काढला.

ही सर्व घटना पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवले. इमरान शेख आणि मोहम्मद वसीम यांना एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. दुबेर शेख याला नागपुरातून ताब्यात घेतले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.