नागपूर : नागपुरात तापमान 43 अंश सेल्सियासच्या पुढं गेलंय. त्यामुळं कडकडत्या उन्हात फिरल्यास उष्माघात (Heatstroke) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे अजून स्पष्ट नसलं तरी उष्माघात, बिमारी असणं, उपाशी पोटी असणं अशा कारणाने झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच त्याचा मृतदेह हा गर्जना बारच्या बाजूने मिळाला असल्यानं त्यानं दारूचं अतीसेवन तर केलं नाही ना याचाही तपास पोलीस करत आहेत. अशी माहिती कपिलनगर (Kapilnagar) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल देशमुख (Police Inspector Amol Deshmukh) यांनी दिली. हा उष्माघाताचा बळी आहे की आणखी काय कारण आहे हे पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर आणि पोलीस तपासात पुढे येईल. मात्र वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
दुसऱ्या एका घटनेत, धरमपेठ परिसरात असलेल्या ग्लो स्पा अँड सलूनमध्ये काही महिलांकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी धाड टाकली. दोन महिलांची सुटका केली तर एका आरोपीला अटक करण्यात आली. नागपूरमधील धरमपेठ हा परिसर उच्चभ्रु लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र या परिसरात ग्लो स्पामध्ये काही युवती आणि महिलांकडून पैशाचं आमिष दाखवून देहव्यापर केला जात असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणची आधी पाहणी केली. नंतर त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. यावेळी दोन महिला त्या ठिकाणी देहव्यापार करत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी त्यांची सुटका करत मुख्य आरोपीला अटक केल्याची माहिती सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली. पोलिसांनी आता तपास सुरू करत या ठिकाणी हा व्यवसाय किती दिवसांपासून सुरु होता. यात आणखी कोण कोण गुंतलं आहे, याचा शोध सुरू केलाय.