आधी कार चोरली, मग दागिने लुटले; अखेर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
नागपुरातील एक क्रेटा कार एका गॅरेजमधून चोरट्याने चोरली. ती कार चोरल्यानंतर त्याने एक मोठी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने लुटले.
नागपूर : नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी एक कार चोरांची गँग पकडण्यात यश मिळविलं. कार चोरी करायची आणि त्याच कारच्या माध्यमातून घरफोड्या सुद्धा करायच्या. असा जणू उद्योगच या चोरट्याने सुरू केला होता. एका आरोपीला गोंदिया जिल्ह्यातून तर एकाला नागपुरातून कार आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पोलिसांनी अटक केली.
क्रेटा कार गॅरेजमधून चोरली
नागपुरातील एक क्रेटा कार एका गॅरेजमधून चोरट्याने चोरली. ती कार चोरल्यानंतर त्याने एक मोठी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने लुटले. तो चोरटा कार घेऊन फिरत होता. कोणाला त्याच्यावर संशयसुद्धा येत नव्हता. मात्र नागपूर पोलिसांना तो वॉन्टेड होता.
कारचा वापर घरफोडीसाठी
या चोरट्याला गोंदियामध्ये गोंदिया पोलिसांनी अटक केली. मग याच्या चोरीचा भांडा फुटायला सुरुवात झाली. त्याने एक दोन नाही तर चार ते पाच कार चोरल्या. त्यानंतर या चोरीच्या कारचा वापर करत तो घरफोडीसुद्धा करायचा. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिनेही लुटले होते.
सात-आठ घडफोड्या केल्याचा अंदाज
या चोरट्याची चौकशी करत असताना त्यांनी सोन्याचे दागिने आपल्या एका साथीदाराजवळ ठेवल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्यालासुद्धा अटक केली. त्यानंतर अनेक खुलासे झाले. जवळपास सात ते आठ घरफोडीच्या घटना तर चार ते पाच कार चोरीच्या घटना त्यांच्याकडून उघडकीस आल्या.
आणखी कुठे चोऱ्या केल्या?
आणखी यांनी कुठे चोऱ्या केल्या का याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अशी माहिती पाचपावलीचे पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम ढाकुलकर यांनी दिली. कारमध्ये फिरवून चोऱ्या करणारा हा हाय प्रोफाईल चोर आता पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे अनेक खुलासे होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे.