नागपूर : व्हेटरनरी कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पावित्रा घेतला. ज्या महाविद्यालयात ते शिकतात, त्याच महाविद्यालयाची गेट आज त्यांनी बंद केली. कारण इंटर्नशीपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करण्यात यावं, अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे.
नागपूर व्हेटरनरी कॅालेजचं मुख्य गेट विद्यार्थ्यांनी बंद केलंय. कॅालेजच्या गेटबाहेर विद्यार्थी बसले. इंर्टनशीपच्या काळातंही विद्यार्थ्यांकडून शिकवणी शुल्क वसूल केला जातो. एका विद्यार्थ्यांकडून 14 हजार रुपये आकारले जातात, त्याविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षकांनाही आत जाऊ दिलं जात नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे कॅालेजची सेवा, रुग्णालय बंद पडलंय.
नागपुरातील विद्यार्थ्यांनी एक मोठं कॉलेज लॉक केलं आहे. विद्यार्थी गेटबाहेर बसल्यानं कॉलेजचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. हे सगळे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत. इंटर्नशिपच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याकडून चौदा हजार रुपये शिकवणी शुल्क आकारण्यात आलं. त्याविरोधात हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. इंटर्नशिपच्या काळातील शिकवणी शुल्क रद्द करण्यात यावं, ही आमची मागणी आहे, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
शिक्षकांना मागील तीन वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. परंतु, फक्त आश्वासन दिलं जातं. प्रत्यक्ष विद्यापीठाकडून कृती होताना दिसत नाही. त्यामुळं हे आंदोलन केल्याचं विद्यार्थी सांगतात. या एकाच नाही, तर राज्यातील पाच महाविद्यालयांची ही मागणी आहे. जोपर्यंत इंटर्नशीप काळातील शिकवणी शुल्क रद्द होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा पावित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलाय. इंटर्नशिपच्या काळात हे विद्यार्थी शेतकऱ्यांपर्यंत जातात. परंतु, त्या काळातलेही शिकवणी शुल्क का घेतला जाते, असा या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेतो आणि विद्यार्थी काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल.