Video- Nagpur | वर्षभरापूर्वी दोन लेस्बियन तरुणी एकत्र आल्या, रिसॉर्टमध्ये साक्षगंध उरकला; आता लग्नाचा बारही उडणार?
आधी तृतीयपंथी, गे व्यक्तींची चर्चा होत होती. लेस्बियन समुदाय पुढं येत नव्हता. समाजात काही तरुणी या लेस्बियन आहेत. त्यांना या निर्णयातून प्रेरणा मिळेल.
नागपूर : नागपुरातील दोन लिस्बियन (lesbian) तरुणींनी क्रांतिकारी पाऊल उचललं. मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत रिसॉर्टवर साखरपुडा केलाय. दोन उच्चशिक्षित तरुणींचा सोबत राहण्याचा निर्धार केलाय. वर्षभरात दोनही तरुणींनी लग्न करणार असल्याचं सांगितलं. नागपुरात डॅाक्टर आणि कॅार्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या या दोन तरुणी आहेत.
दोन्ही कुटुंबीय उच्चशिक्षित
दोन्ही लेस्बियनची कौटुंबिक पार्श्वभूमी उच्च शिक्षित आहे. या दोघींची भेट वर्षभरापूर्वी झाली. त्यानंतर त्यांची मने जुळली. दोघींनीही एकत्र येण्याचा निर्णय केला. घरच्यांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. त्यांच्या लेस्बियन असण्याबद्दल काही दिवसांपूर्वी कळले होते. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. पण, कुटुंबातील लोकं उच्चशिक्षित असल्यानं त्यांनी त्यांना शिकवले. मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी मदत केली.
लेस्बियन असणाऱ्यांना प्रेरणा मिळेल
आधी तृतीयपंथी, गे व्यक्तींची चर्चा होत होती. लेस्बियन समुदाय पुढं येत नव्हता. समाजात काही तरुणी या लेस्बियन आहेत. त्यांना या निर्णयातून प्रेरणा मिळेल. सारथी ट्रस्टच्या माध्यमातून काही समाजोपयोगी काम केले जात असल्याची माहिती सारथी ट्रस्टचे सीईओ आनंद चंद्राणी यांनी दिली.
एलजीबीटी समुदायातील सदस्य प्रगतीवर
एलजीबीटी समुदायाचे अस्तित्व समाजानं स्वीकारलंय. एलजीबीटी म्हणजे लेस्बियन समुदाय. एलजीबीटी किंवा जीएलबीटी याचा अर्थ लेस्बियन, गे, उभयलिंगी किंवा ट्रांसजेंडर असा होता. काही कंपन्यांमध्ये गे व ट्रान्सजेंडर्स चांगल्या पदावर काम करत आहेत. नागपुरातील एक ट्रान्सजेंडर ही देशातील पहिली नर्स म्हणून ओळखली जाते. एलजीबीटी समुदायातील काही सदस्य प्रगतीच्या मार्गावर येताना दिसतात. अशात नागपुरात हा साखरपुडा झाला.