Nagpur Crime: पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी न्यायालयातूनच फरार; नागपूर पोलिसात खळबळ
पोलिसांना तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते, हे तिन्ही आरोपी सराईत असल्याने पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते, मात्र गुन्हेगार सराईत असल्याने त्याने गर्दीचा आणि पोलिसांच लक्ष नसल्याचा फायदा घेत न्यायालयाच्या परिसरातूनच त्याने धूम ठोकली.
नागपूरः नागपूर जिल्ह्यातील कामठी न्यायालयात (kamptee court) एका गुन्ह्यातील तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले जात होते. त्यावेळी न्यायालयाच्या सुनावणी आधी काही वेळ असल्याने आरोपींना घेऊन पोलीस न्यायालयाच्या बाहेर थांबले होते, त्यावेळी एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालयाच्या परिसरातून पळ (Accused escapes) काढला. आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला मात्र खूप प्रयत्न करूनही आरोपी पोलिसांनी मिळून आला नाही. त्यामुळे त्या एका आरोपीचा (accused) शोध घेण्याचे काम सुरु आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या आरोपीचे नाव शेख जाफर शेख मुझफर असे असून त्याच्या शोधासाठी पोलिसांना शोधमोहीम सुरु केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील एका गुन्ह्यात तिघा जणांना अटक करण्यात आली होती, त्या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यासाठी आणले जात होते. पोलिसांनी बंदोबस्तात तीन आरोपींना न्यायालयाच्या आवारातही दाखल केले.
पोलिसांच्या हातावर तुरी…
त्यावेळी त्यांच्या सुनावणीला काही वेळ बाकी असताना पोलीस आरोपींना घेऊन न्यायालयाच्या बाहेर थांबले होते. पोलीस आपापसात बोलत असताना आणि आपल्याकडे पोलिसांचे लक्ष नाही हे त्याच्या लक्षात येताच शेख जाफर शेख मुझफर या आरोपींने संधीचा फायदा घेत पोबारा केला. पोलिसांच्याही ही गोष्टी लक्षात येताच त्याचा पाठलाग सुरू केला मात्र आरोपी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या झाडीतून पसार झाला.
फरार आरोपीचा शोध
पोलिसांना तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते, हे तिन्ही आरोपी सराईत असल्याने पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते, मात्र गुन्हेगार सराईत असल्याने त्याने गर्दीचा आणि पोलिसांच लक्ष नसल्याचा फायदा घेत न्यायालयाच्या परिसरातूनच त्याने धूम ठोकली. या घटनेनंतर त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठेही सापडला नाही. तरीही त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.