नागपूर : शहरात बिल्डर प्रफुल्ल गाडगे यांना पाच कोटींची खंडणी (Ransom) मागण्यात आली. त्यांनी नकार दिल्याने परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. ही चर्चा सुरूच असताना आता दुसरा एक खंडणीचा प्रकार समोर आला. ही खंडणी ग्रामीण भागातील आरोपींनी मागितली. सीसीटीव्हीबद्दल कदाचित त्यांना माहीत नसावे. त्यामुळं दुकानाची तोडफोड (vandalized the shop) करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळं दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यशआलंय. पहिल्या प्रकरणातील आरोपी कोण आहे. याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. कारण त्याने फक्त फोनवरून धमकी दिली होती. आणि लकडगंजमधील प्रकरणात आरोपी खुलेआम दुकानाद येऊन धमकी देत होते. नागपूरच्या लकडगंज पोलीस (Lakdaganj police ) स्टेशन हद्दीतील एका दुकानात खंडणीसाठी शस्त्र घेऊन तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींवर या आधीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत.
लकडगंज परिसरातील वर्धमाननगर चौकात एक दुकान आहे. या दुकानात दोन ते तीन आरोपी आले. त्यांनी दुकानदाराला 10 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला व्यवसाय करता येणार नाही, असं धमकावलं. मात्र, दुकानदाराने खंडणी देण्यास नकार दिला. आरोपी निघून गेले. मात्र थोड्या वेळात हातात शस्त्र घेऊन परत आले. आरोपींनी दुकानात तोडफोड केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 15, 2022
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर एकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती लकडगंडचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी दिली. आरोपी हे ग्रामीण भागातील राहणारे आहेत. त्यांना आपली दहशत पसरवली. हप्ता वसुली करायची होती. मात्र पोलिसांनी त्यांना आता त्याची जागा दाखविली. दहशत माजविण्याचा हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी सुद्धा कडक कारवाई केली आहे.