Nagpur | नायलॉन मांजाविरोधात कारवाई, दीड लाखांचा मांजा जप्त; दुसरीकडं एक जानेवारीपासून पक्षी वाचवा मोहीम

पक्षी वाचवा मोहिमेद्वारे जखमी पक्षी दिसल्यास सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर संस्थेशी संपर्क साधावा. जखमी पक्षी आढळल्यास या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक (0712-2515306) आणि विनीत अरोरा (9860062994) यांना कळवावे, असे सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनीत अरोरा यांनी सांगितले.

Nagpur | नायलॉन मांजाविरोधात कारवाई, दीड लाखांचा मांजा जप्त; दुसरीकडं एक जानेवारीपासून पक्षी वाचवा मोहीम
नागपुरात नायलॉन मांजा व प्लास्टिक विरोधात कारवाई करताना.
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 11:34 AM

नागपूर : नायलॉन मांजाचे दुष्परिणाम होतात. ही बाब लक्षात घेऊन नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी आहे. तरीही मकरसंक्रात आली की, नायलॉन मांजाची विक्री छुप्या पद्धतीनं होते. याला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. आतापर्यंत एक कोटी रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. तर, दुसरीकडं या मांजामुळं पक्ष्यांचेही प्राण जातात. ते जखमी होतात, अशा जखमी पक्ष्यांना वाचविण्यासाठी एक जानेवारीपासून मोहीम राबविण्यात येत आहे.

विक्रीसाठी घरी लपवून ठेवला होता नायलॉन मांजा

कोतवाली पोलिस ठाण्याच्या पथकाने केलेल्या छापामार कारवाईत एक लाख 38 हजार 400 रुपयांचा प्रतिबंधित हा मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 28 डिसेंबर रोजी, दुपारी आरोपी प्रियांश दीपकराव जावळकर (वय 30, रा. दसरा रोड, मांगपुरा) याने त्याच्या घरी प्रतिबंधित नायलॉन मांजाची साठवणूक केली आहे. शिवाय, हा मांजाची विक्री करण्यावर बंदी असतानाही तो छुप्या मार्गाने त्याची विक्री करीत असल्याचे पथकाला कळले. त्यानुसार, पथकाने या ठिकाणी छापा टाकला. आरोपी प्रियांश याच्या घरी नायलॉन मांजा आढळला. हा माल आरोपी सौरभ हरिश्‍चंद्र बनोदे (वय 36, रा. कर्नलबाग, नवी शुक्रवारी पाटील हॉस्पिटलसमोर) यांच्याकडून विक्रीकरिता प्रियांश याने घेतला होता. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी सौरभ याच्या घरी छापा टाकला. या कारवाईत पथकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाचे 196 बंडल व चक्री, असा एकूण 1 लाख 38 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर पोलिसांनी नायलॉन विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आतापर्यंत करोडो रुपयाचा मांजा जप्त केला. या विरोधात रोज कारवाई सुरू आहे. दिल्लीवरून आलेला मांजा जप्त केला. यात एका आरोपीला अटक केली तर दिल्लीच्या एका व्यावसायिकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावार यांनी सांगितलं.

एक जानेवारीपासून पक्षी वाचवा मोहीम

पक्षी वाचवा मोहीम 1 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. नायलॉन मांजात अडकून पक्ष्यांचे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी शहरातील पाच संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संस्थांमध्ये सृष्टी पर्यावरण मंडळ, बर्ड्स ऑफ विदर्भ, इंडियन वाइल्ड लाइफ, हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटी आणि युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर युनिटचा समावेश आहे. मांजामुळे बरेचदा पक्ष्यांचा गळा कापला जातो. त्यांचे पंख छाटले जातात तर कित्येक पक्ष्यांच्या अंगावर मांजाच्या जखमा दिसतात. गेल्यावर्षी या संस्थेत शेकडो पक्षी जखमी झाल्याची नोंद आहे. यासाठी पक्षी वाचवा मोहिमेद्वारे जखमी पक्षी दिसल्यास सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर संस्थेशी संपर्क साधावा. जखमी पक्षी आढळल्यास या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक (0712-2515306) आणि विनीत अरोरा (9860062994) यांना कळवावे, असे सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनीत अरोरा यांनी सांगितले.

Gadchiroli tiger | आधी विजेचा शॉक लावून वाघाला मारले, मग नाल्यात पुरला मृतदेह; नख आणि मुंडके गायब!

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.