कोरोना सरला, आता डेंग्यूचं नवं संकट, आठवड्यात एक कोरडा दिवस पाळण्याचे नागपूरकरांना आवाहन
नागपुरात कोरोनाचा प्रकोप काहीसा कमी झालेला असताना आता डेंग्यूच्या रूपाने नवीन संकट उभं ठाकलं आहे. शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढत असून प्रशासन चिंतेत आहे.
नागपूर : नागपुरात कोरोनाचा (Corona) प्रकोप काहीसा कमी झालेला असताना आता डेंग्यूच्या (Dengue) रूपाने नवं संकट उभं ठाकलं आहे. शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढत असून प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळून डेंग्यू संपविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन येथील प्रशासन करत आहे. (after Corona Nagpur city facing Dengue outbreak administration ordered to take precautions)
डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
नागपूर शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हादरलं होतं. आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रयत्नानंतर आता कोरोनाचे रुग्ण येथे कमी झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी येथे सध्यातरी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. असे असताना आता नागपूरकरांवर नवीन संकट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळ्यामुळे येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक तज्ज्ञांनी तसा इशारा दिला आहे. याच कारणामुळे प्रशासनाने येथील नागरिकांना आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे.
ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले
पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवतात. डेंग्यू तसेच इतर आजार डोकं वर काढतात. सध्या अनियमित पाऊस असल्याने असे रोग होण्याची शक्यता जास्त आहे. नागपुरात कधी पाऊस येतो तर कधी ऊन्हं पडतं. उकाडा वाढल्यामुळे येथील नागरिकांनी अजूनही घरातील कुलर काढलेले नाहीत. त्यातही सध्याच्या अनियमित पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. या डबक्यांमध्ये कचरा कुजतो. परिणामी मच्छरांचे प्रमाणही वाढते. याच कारणामुळे आता प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
दरम्यान, सध्याच्या डेग्यूच्या मच्छरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवाहन केल्यानंतर येथील जिल्हाधिकारी आर. विमला यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डेंग्यूचे मच्छर हे कुलरमध्ये साचलेल्या पाण्यात तसेच छोट्या-छोट्या डबक्यात निर्माण होतात. हे मच्छर दिवसाला चावतात. या मच्छरांपासून बचाव करायचा असेल तर फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता पाळणे, घरातील भांड्यात किंवा बाहेर पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले
इतर बातम्या :
महापालिकेचा भलताच थाट, महापौरांसाठी 11 लाखांची गाडी, 1111 नंबरसाठी 70 हजार रुपये खर्च
‘कुणी लसीचा दुसरा डोस देतं का रे?’, नागपुरात आज पुन्हा लसीकरण बंद, लसीसाठी जेष्ठ नागरिकांची भटकंती
(after Corona Nagpur city facing Dengue outbreak administration ordered to take precautions)