इतक्या वर्षांनंतर प्रत्येक गाडी स्क्रॅप करावी लागणार, नितीन गडकरी यांनी सांगितलं

ऑरगॅनिक शेतीसाठी बाजार उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जागा मागितली आहे. तो सुद्धा लवकरच सुरू होईल.

इतक्या वर्षांनंतर प्रत्येक गाडी स्क्रॅप करावी लागणार, नितीन गडकरी यांनी सांगितलं
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 4:30 PM

नागपूर – 15 वर्षांनंतर आता भारत सरकारच्या अखत्यारीत प्रत्येक गाडी स्क्रॅप करावी लागणार आहे. त्यासाठी स्क्रॅपिंग युनिटसुद्धा लावले जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते नागपुरातील ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण उपस्थित होते. नागपुरात पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर कृषी कन्व्हेंशन सेंटर निर्माण केलं जाणार आहे. ते पुढील कृषी प्रदर्शनीच्या आधी सुरू होईल. याला केंद्रीय कृषीमंत्री यांनी मान्यता दिली.

ऑरगॅनिक शेतीसाठी बाजार उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जागा मागितली आहे. तो सुद्धा लवकरच सुरू होईल.  बांबूपासून इथेनॉल बनविला जाणार आहे. यातून शेतकरी अन्नदात्यासोबत ऊर्जादाता सुद्धा बनणार आहे. आम्ही लवकरच इथेनॉल पंप सुरू करणार आहोत. त्यानंतर मला वाटतं पेट्रोलची आवश्कता पडणार नाही. माझ्या मनात एक संकल्प आहे.

विदर्भ पेट्रोलमुक्त करायचा आहे. पण अशक्य नाही. माझ्याकडे बायो सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर आहे. तो डिझलपेक्षा स्वस्त पडतो. तसे ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी वापरावे, असेही नितीन गडकरी म्हणाले. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आता करणे आवश्यक आहे.

सीएनजीचा वापर सुरू झाला, तर आपले इम्पोर्ट ड्युटीचे पैसे वाचणार आहेत. आता आम्हाला ऊर्जा आयात करणारा नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनायचं आहे. मी अमेरिकेतून एक हायट्रोजनवर चालणारी ऑटो रिक्षा मागविली. ती दिल्लीला पोहचणार आहे.

काही गोष्टी मी सांगतो. त्यावर विश्वास बसत नाही. पण मी त्या यशस्वी करून दाखवतो. जलसंवर्धनमध्ये आम्ही मोठं काम केलं. NHI अंतर्गत अनेक तलाव बनवून दिले. दूध उत्पादनात आमचा विदर्भ मागे आहे. त्याबाबत आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दूध उत्पादन वाढविणार आहे. यासाठी एक संशोधन झालं. त्यातून गाय आता गोरीलाच जन्म देईल.

भातापासून इथेनॉल बनविण्याचा काम सुरू झालं. शेतकऱ्याचं उत्पादन वाढणे महत्वाचं आहे. त्यावर चांगले संशोधन सुरू आहे. पण आणखी व्हायला पाहिजे. शेतीत ड्रोनच्या माध्यमातून नैनो युरियाचा वापर केला तर त्यात मोठी बचत होऊ शकते. याचा प्रयोग आम्ही केला. हे सगळे प्रयोग यशस्वी झाले आणि शेतकरी आत्महत्या थांबल्या त्या दिवशी आम्ही समजू आम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी झाले, असं गडकरी यांनी सांगितलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.