“नुकसानग्रस्त शेतीचे 83 टक्के पंचनामे पूर्ण”; मदतीबाबतचा अंतिम निर्णय कृषीमंत्र्याकडून स्पष्ट
सतत पावसाने नुकसान सुरु आहे. पावसामुळे चौथ्यांदा ही शेतकऱ्यांवर आपत्ती ओढावली आहे. त्यामुळे नुकसान झालेला शेतकरी भरपाई पासून वंचित राहणार नाही असं अश्वासनही त्यांनी दिले आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात अवकाळी आणि गारपाटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमधून चार वेळा नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी अवकाळीचा पिकांना फटका बसल्यानंतर उभा पिकावर नांगर फिरवला आहे. अवकाळा पावसाचा चौथ्यावेळी शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा दौरा करून शेतकऱ्यांच्या दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, राज्यातील कोणताही शेतकरी नुकसानग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहणार नाही.
त्यानंतर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून कोणताही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही अशा शब्दात त्यांनी अश्वासन दिले आहे.
ot
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर आता शेतकऱ्यांना सरकारतर्फे मोठं अश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गही आता आशावादी झाला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसाना झाले आहे. उभा पिकावर शेतकऱ्यांना नांगर फिरवावा लागल्यामुळे सरकारने आता तरी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती.
अवकाळी पावसाने चौथ्यांदा शेतकऱ्यांचे नुकसान केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून पुढील दहा दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट केले आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी आणि गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी सांगितले आहे की, येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाने मोठं नुकसान झाले असल्यामुळे आम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांची माहिती घेतली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे आल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असल्याचेही अश्वासन त्यांनी दिले आहे.
संभाजीनगरमध्ये 6 हजार तर मराठवाड्यात 11 हजार तर राज्यात 43 हजार हेक्टरच्या वर नुकसान झाले असल्याची आकडेवारी अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांना याआधी ही मदत केली आहे. मात्र आताही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आताही सरकरा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
त्यामुळे नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्यात येणार अस्लयाचेही त्यांनी सांगितले. राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी तंतोतंत माहिती घेणं सुरु आहे.
सतत पावसाने नुकसान सुरु आहे. पावसामुळे चौथ्यांदा ही शेतकऱ्यांवर आपत्ती ओढावली आहे. त्यामुळे नुकसान झालेला शेतकरी भरपाई पासून वंचित राहणार नाही असं अश्वासनही त्यांनी दिले आहे.
सध्या 83 टक्के पंचनामे झाले असून उरलेले पंचनामे लवकरच करण्यात येणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचे अश्वासन त्यांनी दिले आहे.