Amravati Corona Update | अमरावतीकर घेणार ‘मोकळा श्वास’, लॉकडाऊनमध्ये शिथिलता, काय सुरु, काय बंद?

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन (Amravati Corona Update) लावण्यात आला होता.

Amravati Corona Update | अमरावतीकर घेणार 'मोकळा श्वास', लॉकडाऊनमध्ये शिथिलता, काय सुरु, काय बंद?
Amravati Lockdown
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 3:19 PM

अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन (Amravati Corona Update) लावण्यात आला होता. मात्र, आज 9 मार्चला सकाळपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे. जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते 4 या वेळात सुरु राहणार आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरु तर इतर कार्यालयाच्या सेवा किमान 15 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत. सुरक्षित अंतर, मास्क, स्वच्छता न आढळल्यास दुकान पाच दिवस सील होणार आणि आठ हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे (Amravati Corona Update Lockdown Relaxed).

आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक

आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केली आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ पद्धत राबवणे आवश्यक असेल. लॉजिंग सेवा 25 टक्के क्षमतेत सुरु राहील. ग्राहकाला रुममध्ये सीलबंद सेवा, नियमभंग झाल्यास 15 हजार रुपये दंड राहणार आहे. कोरोना त्रिसूत्रीचं पालन होते की नाही हे तपासणीसाठी दुकानतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जाणार आहे. जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, महाविद्यालयं, तरण तलाव, मनोरंजन गृह, नाट्यगृह आणि सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमांना मात्र बंदी राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

नियमभंग करणाऱ्यांवर 20 पथकांची नजर

अमरावती संचारबंदीत शिथीलता आणल्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी दुकानदार आणि नागरिकांकडून नियमांचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी शहरात परिसरनिहाय विशेष पथके नियुक्त केली आहेत. त्यात चार उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच पथकांमागे एक याप्रमाणे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, प्रत्येक पथकात विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या पथकांकडून सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्यांना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. दुकानदार, भाजीविक्रेते यांनी 2 ग्राहकांमध्ये 3 फूट अंतर, मार्किंग न करणे आढळल्यास दुकानदाराला 8 हजार दंड आणि सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या ग्राहकाकडूनही 300 रुपये दंड आकारण्यात येईल. किराणा दुकानदाराने वस्तूंचे दरपत्रक न लावल्याचे आढळल्यास 3 हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. या सर्व कृती दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालय क्षेत्रात कार्यवाहीची जबाबदारी कार्यालयप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. या पथकांकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे (Amravati Corona Update Lockdown Relaxed).

अमरावतीमध्ये वाढती रुग्णांची संख्या बघता मनपाने सुद्धा कठोर पाऊल उचलली आहे. सर्व व्यापारी आणि नागरिकांनी त्रीसुत्रीचं पालन करावं आणि अमरावती कोरोना मुक्त करावे, असे आव्हान अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे.

अमरावतीमध्ये वाढत्या रुग्णांचे कारण म्हणजे लोकांचा निष्काळजीपणा आणि बदलते वातावरण असल्याचे मत अमरावतीचे शल्य चिकित्सक शाम सुंदर निकम यांनी व्यक्त केलं आहे. तर जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत असून, लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील सहा नव्या केंद्रांसह जिल्हा रूग्णालयाच्या ज्येष्ठ नागरिक वॉर्डातही नवे केंद्र सुरु करण्यात आले आहे.

Amravati Corona Update Lockdown Relaxed

संबंधित बातम्या :

अमरावतीत कोरोनाचा हाहाकार, तर लॉकडाऊनच्या निर्णयावरुन लोकप्रतिनीधींचा प्रशासनावर आरोप

अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा 7 दिवसांची संचारबंदी; तीन शहरं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.