अमरावती शहरात 12 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, मनपा आयुक्तांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी
अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत.
अमरावती : अमरावती जिल्ह्यात दर दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे (Amravati Lockdown Update). अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत (Amravati Lockdown Update).
या ठिकाणी मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी कंटेन्मेंट झोन असलेल्या श्रीकृष्ण पेठ येथे पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. या 12 प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला. अमरावती मनपा हद्दीत सध्या 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.
अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्राकडे मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा
अमरावती प्रतिबंधित क्षेत्राकडे मनपा आयुक्तांनी पाहणी दौरा केला. या क्षेत्रातील व्यक्ती बाहेर निघाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. या 12 प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट
अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाचा स्फोट झाला. आज जिल्ह्यात तब्बल 727 रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज 2,131 रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 34.11 टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Amravati Lockdown Update).
लॉकडाऊनमुळे बस सेवा देखील बंद
आज अमरावतीमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बस सेवा देखील बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होतं आहे. अमरावती हे विभागाचे ठिकाण असून या ठिकाणी नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, औरंगाबादसह इतर जिल्ह्यात बस सेवा सुरु राहतात. मात्र, इतर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बाहेर काढले जाणारे अनेक प्रवासी बस स्थानकामध्ये थांबलेले आहेत. लॉकडाऊन असल्याने बस सेवा बंद आहे. त्यामुळे या प्रवाशांना आजची रात्र बसस्थानकावरच काढावी लागणार आहे.
मोठा निर्णय! पुण्यात सोमवारपासून ‘नियंत्रित संचार’, विवाह सोहळे, हॉटेल, महाविद्यालांना बंधने; वाचा काय काय असतील निर्बंधhttps://t.co/pknS1YeKNP#pune | #coronavirius | #Corona | #maharashtra | #ajitpawar | #coronainpune
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
Amravati Lockdown Update
संबंधित बातम्या :
‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना’; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले
कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण