Fadnavis | अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वाद; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला कोणतीही असो त्यांच्याबदद्ल बोलताना काळजी घेतली पाहिजे. केवळ पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे.
काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला कोणतीही असो त्यांच्याबदद्ल बोलताना काळजी घेतली पाहिजे. केवळ पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी.
काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण
भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख जितेन गजारिया. याने एक वादग्रस्त ट्वीट केले. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले, असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. राबडीदेवीला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावे वाटते, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
अमृता फडणवीसांचे विद्या चव्हाणांना उत्तर
अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाणांना उत्तर दिले. शिवाय त्यांना अब्रुनुकसानीची नोटीस धाडली. त्यानंतर एक ट्वीट केले. त्यात त्या म्हणतात, आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! @Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !