Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; शिव्या देणाऱ्यांना मान-सन्मान, तर देवाचं नाव घेणाऱ्यांना…

हे सर्व हल्ले राज्याच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या परवागीशिवाय होऊ शकत नाहीत. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. मात्र, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी केलाय.

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; शिव्या देणाऱ्यांना मान-सन्मान, तर देवाचं नाव घेणाऱ्यांना...
अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 1:49 PM

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. त्या ट्विटमधून त्यांनी राज्य सरकारवर प्रहार केलाय. सध्या कलयुग सुरू आहे. या कलयुगातील (King of Kali Yuga) राजानं एक फर्मान सोडलं. जे लोकं विनाकारण चमचेगिरी करतात. शिव्या शाप देतात. घोषणाबाजी करतात. त्यांना या राज्यात मान-सन्मान आहे. परंतु, जे लोकं देवाचं नामस्मरण (Remembrance of God) करतात. त्यांच्या जीवावर हे सरकार उठलं आहे, अशा आशयाचं हे टि्वट आहे. पाहुयात त्यांचं नेमकं ट्विट काय. कलियुग के इस राजा ने अब दिया एक फ़रमान है…. जो उगलेगा ‘च’ की गाली, उसे इज़्ज़त और मान है, जो जपेगा नाम प्रभु का, उसकी हलक में जान है !

विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य

या ट्विटमुळं अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत आल्यात. राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना यात अमृता फडणवीस यांचीही आता भर पडली. याचं कारण सध्याची राजकीय परिस्थिती आहे. विद्यामान परिस्थितीत राज्य सरकारनं राणा दाम्पत्याला अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केला. खरं तर राणा दाम्पत्य हे हनुमान चालीसा म्हणत होते. ते शांततेच्या मार्गानं मातोश्रीवर जाणार होते. अशा परिस्थितीत त्यांच्या घरात घुसून पोलिसांनी त्यांना अटक केली. बघा अमृता फडणवीस यांनी नेमकं काय ट्विट केलंय.

वाचा ट्विट

मोहित कंबोज, किरीट सोमय्यांवरही हल्ले

भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यावर हल्ले करण्यात आले. या प्रकरणामुळं भाजप चांगलीच संतप्त झाली आहे. जे लोकं राज्य सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणतात त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. शिवसैनिक यात पुढाकार घेत आहेत. हे सर्व हल्ले राज्याच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या परवागीशिवाय होऊ शकत नाहीत. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. मात्र, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप या माध्यमातून अमृता फडणवीस यांनी केलाय.

MP Navneet Rana | खासदार नवनीत राणांचा बीपी वाढला? भायखळा कारागृहातील रुग्णालयात प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Heat wave : विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता

Breaking : समृद्धी महामार्ग संदर्भातली मोठी बातमी! 2 मे रोजीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला- सूत्र

आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.