…तर अंनिसला कुलूप ठोकतो; नेमकं प्रकरणं काय, आणि कुणी दिला हा इशारा…
धीरेंद्र महाराज यांचा नागपूमध्ये 5 13 जानेवारी रोजी कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र श्याम मानव यांनी चॅलेंज दिल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम दोन दिवस कमी करून त्यांनी तिथून पळ काढला.
नागपूरः मागील गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि धीरेंद्र शास्रींना दिलेल्या आव्हानामुळे धीरेंद्र शास्री आणि अंनिसचा वाद चर्चेत आला आहे. श्याम मानव यांनी थेट शास्री यांच्या दिव्यशक्तीला चॅलेंज देत राज्यात जादूटोणा कायद्याचं उल्लंघण केला असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी रायपूरमध्ये जाऊन तु्म्ही भक्तांच्या आड का लपता असा सवालही श्याम मानव यांनी केला आहे. तुमच्यामध्ये धमक असेल तर तु्म्ही नागपुरमध्ये येऊन तुमची शक्ती सिद्ध करा’ असं आव्हान श्याम मानव यांनी दिले.
श्याम मानव यांनी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराज यांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे 30 लाख रुपयांचे बक्षीस आव्हान दिलं होते. त्यानंतर हे आव्हान धीरेंद्र महाराज यांनी आपल्या रायपूरमधील दरबारामध्ये हे आव्हान स्वीकारलं.
तसेच रायपूरमधील दरबारात या, अशी अट ठेवण्यात आली. त्यामुळे श्याम मानव तुमच्याकडे जर दिव्यशक्ती असेल तर आम्ही तुमच्यासमोर दहा लोकं उभा करतो. त्यांची नावं, त्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांच्या शेजारी ठेवलेल्या वस्तूंची तुम्ही नाव सांगा असा थेट इशाराच त्यांना दिला होता.
धीरेंद्र महाराज यांचा नागपूमध्ये 5 13 जानेवारी रोजी कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र श्याम मानव यांनी चॅलेंज दिल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम दोन दिवस कमी करून त्यांनी तिथून पळ काढला.
आणि श्याम मानव यांना आपल्या आश्रमामध्ये येण्याचे आव्हान दिले. त्यामुळे हा वाद आणखी पेटला. त्यानंतरही श्याम मानव यांनी त्यांनी 30 लाखाचे बक्षीस जाहीर करून तुम्ही तुमचे दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवा असं जाहीर आव्हान दिले होते.
जर तुम्ही हे सिद्ध केले तर तुम्हाला 30 लाख रुपये देऊ आणि आमच्या अंनिसला कुलूप ठोकू असंही स्पष्ट करण्यात आले.