Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या मदतीला आंध्र प्रदेश धावलं, 300 व्हेंटिलेटर्स देण्याची जगनमोहन रेड्डींची घोषणा, नितीन गडकरींची शिष्टाई यशस्वी

महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. Jagan Mohan Reddy announces 300 Ventilators to Maharashtra

महाराष्ट्राच्या मदतीला आंध्र प्रदेश धावलं, 300 व्हेंटिलेटर्स देण्याची जगनमोहन रेड्डींची घोषणा, नितीन गडकरींची शिष्टाई यशस्वी
YSR Jagan Mohan Reddy
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 12:57 PM

नागपूर: महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी महाराष्ट्र केंद्राकडं आर्जव करत आहे. महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली. (Andhra Pradesh CM Y S Jagan Mohan Reddy announces that they will send 300 Ventilators to Maharashtra after discussion with Nitin Gadkari )

नितीन गडकरींची जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्याचर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केल्याची माहिती नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांचे रेमडेसिव्हीरसाठी प्रयत्न

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.

महाराष्ट्राला 70 हजार रेमडेसिव्हीर प्रतिदिन व्हायल्सची गरज

रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिव्हीरमुळे कमी होतो. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज 70 हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज 27 हजार व्हायल्सचे वाटप रेमडेसिव्हीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परदेशातून रेमडेसिव्हीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी ! देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

उद्धव ठाकरेंनी ऑक्सिजन एअरलिफ्टिंग संकल्पना मांडली, ‘या’ राज्यानं थेट करुन दाखवलं

(Andhra Pradesh CM Y S Jagan Mohan Reddy announces that they will send 300 Ventilators to Maharashtra after discussion with Nitin Gadkari)

अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.