Rohit Pawar in Nagpur | अनिल देशमुख यांचा आज वाढदिवस; रोहित पवारांच्या हस्ते काटोलमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन

रोहित पवार म्हणाले, अनिल देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. अनिल देशमुख आपले सर्वांचे नेते आहेत. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मतदारसंघात अतिशय चांगली काम झाली आहेत.

Rohit Pawar in Nagpur | अनिल देशमुख यांचा आज वाढदिवस; रोहित पवारांच्या हस्ते काटोलमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 9:48 AM

नागपूर : आज राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा वाढदिवस. त्या निमित्तानं आमदार रोहित पवार हे काटोल विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिला आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आलंय. तिथं रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, ते काटोल नगर परिषदेला (Nagar Parishad Katol) भेट देतील. मानवविकास अभ्यासिका (Human Development Study) केंद्रालाही भेट देणार आहेत. कलंभा येथे पुलाचे उद्घाटन करणार आहेत. गोंडी दिग्रस येथील रस्त्याचे उद्घाटन करतील. सोनोली-तपनी रस्ता भूमिपूजन तसेच नरखेड येथे अपंग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना रोहित पवार उपस्थित राहतील. अनिल देशमुख कैदेत असले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) त्यांच्या पाठिशी आहे. हे दाखविण्याचा यातून प्रयत्न दिसून येतो.

कामासाठी अधिकाऱ्यांवर दबाव

दौऱ्यावर निघण्यापूर्ण नागपुरात रोहित पवार म्हणाले, सुजय विखे पाटलांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, कर्जत जामखेडमधील अधिकार्‍यांवर माझा दबाव नक्कीच आहे. सामान्य लोकांची काम करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच. आमदार एवढा काम करत असेल आणि लोकांच्या हितासाठी लोकात जाऊन काम करत असेल. तर को-ऑर्डिनेशनचा काम करण्यासाठी मला जास्त पीए लागतीलच. मुळात ते पीए नाही तर कॉर्डिनेटर आहेत. कदाचित सुजय विखेंना हेच सांगायचं होतं की त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम सुरू आहे. आता काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही ते पाहण्यासाठी माझे अनेक कॉर्डिनेटर त्या ठिकाणी कार्यरत आहेत.

धार्मिक स्थळांचा अनुभव प्रेरणादायी

रोहित म्हणाले, अनिल देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. अनिल देशमुख आपले सर्वांचे नेते आहेत. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मतदारसंघात अतिशय चांगली काम झाली आहेत. दरम्यान, अयोध्या भेटीसंदर्भात रोहित पवार म्हणाले, कुठल्याही धार्मिक स्थळावर गेल्यानंतर येणारा अनुभव प्रेरणादायी असतो. अयोध्येसह अजमेर, वाराणसी, पुष्कर आणि सारनाथला ही जाऊन आलो. मन प्रसन्न झालं. ही कौटुंबिक व्हिजिट होती. जसे तुम्ही कुटुंबासह मंदिरात जाता. तसेच मी पण कुटुंबासह गेलो होतो.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.