Nagpur Crime | धक्कादायक! दुसरीही मुलगी झाली म्हणून तिला विकले; मौजमजेसाठी बाईक, कुलर खरेदी

नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. दुसरीही मुलगी झाली म्हणून दारुड्या बापानं चक्क आपल्या पोरीलाच विकण्याचा सौदा केला. ही बाब लक्षात येताच मुलीच्या आईनं तक्रार केली. त्यामुळं दारुड्या बापाला आता पोलिसांनी जेरबंद केलंय.

Nagpur Crime | धक्कादायक! दुसरीही मुलगी झाली म्हणून तिला विकले; मौजमजेसाठी बाईक, कुलर खरेदी
पाचपावली पोलीस हद्दीत ही घटना घडली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 9:28 AM

नागपूर : नागपुरात नवजात बाळाला पित्यानेच विकल्याचा (Baby sold by father) प्रकार समोर आला होता. बाळाला विकून या पित्याने बाईक, होम थिएटर आणि कुलर खरेदी केल्याची माहिती पुढं आलीय. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी वडिलांसह मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केलीय. नागपूरच्या पाचपावली पोलीस (Pachpavli Police) स्टेशन हद्दीतील राणी दुर्गावती चौकात (Rani Durgavati Chowk) भंडारा जिल्ह्यातून कामाच्या शोधत आलेलं एक दाम्पत्य राहत होतं. दोघेही मोलमजुरीची काम करत होते. मात्र पती उत्कर्ष दहिवले हा दारुडा होता. त्यानं दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे. दुसऱ्या पत्नीपासूनही मुलगी झाल्यानं तो नाराज होता. त्यामुळं त्याने मुलीला विकण्याचा कट आखला.

मुलीच्या आईने दिली तक्रार

नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. दुसरीही मुलगी झाली म्हणून दारुड्या बापानं चक्क आपल्या पोरीलाच विकण्याचा सौदा केला. ही बाब लक्षात येताच मुलीच्या आईनं तक्रार केली. त्यामुळं दारुड्या बापाला आता पोलिसांनी जेरबंद केलंय. मुलीच्या वडिलाच्या संपर्कात उषा सहारे नावाची महिला आली. तिने त्याला पैसे मिळवून देण्याचं अमिष दाखविलं. ती खाजगी अनाथ आश्रमात काम करते. तिने उमरेडमधील एका गरजू दाम्पत्याला पकडलं. 70 हजार रुपयांत बाळाचा सौदा केला. मात्र बाळाच्या आईला याची माहिती मिळताच तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली. पोलिसांनी बाळाच्या पित्याला आणि दलाल महिलेला याप्रकरणी अटक केलीय. अशी माहिती पाचपावली पोलीस स्टेशनच्या एपीआय मिनाश्री काटोले यांनी दिली.

बाप नव्हे साप

पोटच्या मुलीला विकून वडिलाने बाईक खरेदी केली. हृदय हेलावणारी ही घटना नागपुरात घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलासह मध्यस्ती महिलेला अटक करण्यात आली. बापाचं काम हे मुलांचं पालन पोषण करण्याचं असते. पण, दारुड्या बाप असल्यानं त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. मोलमजुरी करत असल्यानं त्याला पैशाची कमतरता जाणवत होती. यासाठी त्यानं पैशाच्या मोहात चक्क मुलीलाच विकण्याचा बेत आखला. यात तो अडकला. त्याच्या पत्नीनंच तक्रार केल्यानं तो फसला. हा बाप साप निघाला. त्यानं चक्क आपल्या पोटच्या मुलीवरच घात केला. तिला तिच्या मायेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, आता तो यात फसला. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश

Amravati | अचलपूरमधील दोन गटांतील दगडफेक प्रकरण, भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला तीन दिवस पोलीस कोठडी

Video Nagpur Fire | नागपुरात भरदुपारी दुचाकी पेटली; महाकाली चौकात धुराचे लोळ

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.