Nagpur Corona | कोरोनाचा आणखी एक बळी, 54 पॉझिटिव्ह, बालकांचे लसीकरण लवकरच

एकाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली. आज 4662 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. नागपूर जिल्ह्यात 415 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.

Nagpur Corona | कोरोनाचा आणखी एक बळी, 54 पॉझिटिव्ह, बालकांचे लसीकरण लवकरच
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 7:47 PM

नागपूर : नागपुरात आज 54 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. कित्येक दिवसांनंतर एका रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाला. तर 3 जणांनी कोरोनावर मात केली. एकाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली. आज 4662 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. नागपूर जिल्ह्यात 415 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.

15 ते 18 वर्ष वयोगटाचे लसीकरण 3 जानेवारीपासून

नागपूर शहरातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे शहरात सात लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मनपाकडे शाळांद्वारे येणाऱ्या विनंतीनुसार त्या-त्या शाळांमध्ये लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. 18 वर्षावरील वयोगटाचे लसीकरण नियमित सुरूच राहिल. लसीकरणासाठी पात्र नागपूर शहरातील सर्वांनीच सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा आणि आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

31 डिसेंबर 2007 पूर्वी जन्मलेला बालक असावा

नागपूर शहरात 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), एम्स, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, प्रगती सभागृह, दिघोरी, आयसोलेशन हॉस्पिटल, मध्य रेल्वे रुग्णालय, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कामठी रोड या सात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांवर सोमवार 3 जानेवारी 2022 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कोव्हिड प्रतिबंधात्मक लस दिली जाईल. या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सीन लस देण्यात येईल. त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. 31 डिसेंबर 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. लस घेतल्यानंतर मुलांची देखरेख करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध राहतील आणि त्यांना अर्ध्या तासाने घरी सोडले जाईल.

लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक

कोरोनाच्या संक्रमनापासून सुरक्षेसाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यावश्यक आहे. शहरात सध्या 17 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आता 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात येत आहे. या वयोगटात विद्यार्थी असल्याने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी नागपूर महापालिकेद्वारे शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रतिनिधींद्वारे लसीकरणासाठी मनपाला सहकार्य मिळणार आहे. शैक्षणिक संस्थांद्वारे त्यांच्या शाळेच्या, संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शिबिर आयोजित करायचे असल्यास त्यांनी मनपाला माहिती द्यावी. पालकांच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

NMC scam | मनपा स्टेशनरी घोटाळा, पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला घेरले; कशी गाजली मनपाची सभा?

Nagpur Crime | मध्यप्रदेशातून येत होता बनावट मद्यसाठा, राज्य उत्पादन शुल्क विभागानं टाकला छापा; 15 लाखांची दारू जप्त

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.