नागपुरात शनिवारी लोकअदालत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आयोजन, जिल्हा न्यायालयात संपर्क साधण्याचे आवाहन

राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरच्या वतीने शनिवार, 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जनतेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी जिल्हा न्यायालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागपुरात शनिवारी लोकअदालत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आयोजन, जिल्हा न्यायालयात संपर्क साधण्याचे आवाहन
नागपुरात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 6:36 AM

नागपूर : लोकअदालतीमागचा (Lok Adalati) मुख्य उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्त्वाची प्रकरणे, लोक न्यायालयासारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली व निवारण करणे हा आहे. प्रलंबित प्रकरणामधून योग्य प्रकरणांची छाननी करून आपसी समझोत्याकरिता प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीकरिता ठेवणे हा आहे. 12 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठ, जिल्हा न्यायालय (District Court), सर्व न्यायाधीकरण आणि तालुका न्यायालय (Taluka Court) याठिकाणी एकाचवेळी राष्ट्रीय लोक अदालत भरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोर्टातील खालील प्रकारची न्यायालयातील प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे विविधस्थानी आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

या प्रकरणांचा राहणार समावेश

समझोता योग्य फौजदारी प्रकरणे, पराक्राम्य दस्ताऐवज अधिनियमाच्या कलम 138 ची प्रकरणे, अधिकोष वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राध्धिकरणातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जातील. अपघात माहिती अहवाल, राज्य परिवहनाची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुनर्नियुक्तीमधील जुन्या वेतनासबंधीची प्रकरणे निकाली काढली जातील. भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलांची (सोबत चोरीची ) प्रकरणे, नोकरीसबंधी प्रकरणे, -ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायद्यासंबंधित प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे, जसे भाडेसंबंधी वहिवाटसबंधीचे दावे, ग्राहक तक्रारीचे सबंधित प्रकरणे.

नागपूर जिल्ह्यात एकूण 30 हजार प्रलंबित प्रकरणे

लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण 30 हजार प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरद्वारा आयोजित लोकअदालतीमध्ये पूर्वबोलणी आणि समोपचाराने पक्षकारांमधील वाद खेळीमेळीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर एस. बी. अग्रवाल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर सचिव अभिजित ग. देशमुख यांनी सर्व सबंधित पक्षकारांना आवाहन केले आहे की, या संधीचा फायदा 12 मार्च 2022 रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर अभिजित देशमुख यांनी केले आहे.

नागपुरात 4 अर्भकं सापडल्याने खळबळ, मोकळ्या मैदानात अर्भकं आली कुठून?

Photo – अकोल्याच्या सातपुडा पर्वतरांगेत वाघोबाचे दर्शन! अमरावतीचे पर्यटक झाले प्रसन्न

धक्कादायक! गोंदियात सांभाळायला दिले तिनेच केली मुलाची विक्री, आई पाहायला गेली तेव्हा फुटले बिंग

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.