घराच्या बांधकामासाठी लागत होते जास्त पाणी, त्यावरून झालेल्या वादात भावाचाच खून
भांडण सोडवायला गेलेले आई-वडीलसुद्धा यात जखमी झाले.
नागपूर : एकाच कुटुंबातील दोन भावांच्या कॉमन विहिरीमधील पाण्यावरून झगडा झाला. त्यात एकाची हत्या झाल्याची घटना नागपूरच्या कोतवाली पोलीस (Police) स्टेशन हद्दीत घडली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरच्या (Nagpur) कोतवाली परिसरात शाहू कुटुंब राहते. दोघा भावांच्या घरात एक कॉमन विहीर आहे. त्या विहिरीचं मोटर लावून पाणी घेण्यावरून वाद झाला. वाद वाढत गेला आणि दोन्ही कुटुंबात हाणामारी झाली. त्यात एकाची हत्या झाली. मृतकाचं नाव अभिषेक साहू आहे. त्याचा जागेवरच जीव गेला.
भांडण सोडवायला गेलेले आई-वडीलसुद्धा यात जखमी झाले. मृतकाच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी त्याला जास्त पाणी लागत होते. यावरून वाद होत होता. त्यातूनच ही हत्या झाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती एसीपी संजय सुर्वे यांनी दिली.
वादाच कारण क्षुल्लक होतं. पाणी वापरण्याचा वाद होता. त्यातही आरोपी आणि मृतक एकमेकांचे नातेवाईक असतानासुद्धा एवढी टोकाची भूमिका घेण्यात आली. परिवारातीलच व्यक्तीची हत्या झाली. त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाणी तसे कुणाच्या मालकीचे नसते. पण, वादचं करायचा असेल तर तो कोणत्याही कारणातून करता येतो. संताप अनावर झाल्यास अशा खुनाच्या घटना घडतात. मात्र, अशा घटनांचा शेवट फारच वाईट होतो. अख्ख कुटुंब उद्धस्त होतं.
यातून साहू कुटुंब आता सावरू शकणार नाही. एकाचा खून झाला. दुसरा पोलिसांच्या कोठडीत गेला. आई-वडील जखमी झाले. घरचे अख्ख कुटुंब या धक्क्यातून सावरू शकणार नाही.