Ashish Deshmukh | काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव दुर्दैवी, नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा, आशिष देशमुख यांची मागणी
ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी घेतली होती. राजीनामा दिला होता. माझ्या वडिलांनीसुद्धा जबाबदारी घेत राजीनामा होता. त्याप्रमाणे आता नाना पटोले यांनी सुद्धा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, असं देशमुख म्हणाले.
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. चंद्रकांत हांडोरे हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. हांडोरे हे एक दलित नेते आहेत. ते 1 नंबरवर होते. त्यांचा कोटा ठरला होता. अशा व्यक्तीचा पराभव होतो. हे अतिशय दुर्दैवी आहे, असे मत माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. हांडोरे यांचा पराभव का झाला. यावर काँग्रेसने एक चौकशी बसवावी. नैतिकतेच्या आधारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही (Demand) देशमुख यांनी केली. नाना पटोले हे दिवसभर व्ही दाखवत राहिले. निकाल लागण्याच्या आधी नागपूरला आले. या मंत्र्यांनी विदर्भाच्या समस्यांकडे (Problem) दुर्लक्ष केलं. जे जे विदर्भातील (Vidarbha) मंत्री आहेत त्यांच्यावर नाराजी होती. आमदार यांची नाराजी होती. नाना पटोले हे विदर्भातील आहेत. आज जे नाट्य घडत आहे त्याला विदर्भातील नाराजीचं कारणीभूत आहे, असं मला वाटत असंही देशमुख म्हणाले.
नाना पटोलेंनी जबाबदारी स्वीकारावी
ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी घेतली होती. राजीनामा दिला होता. माझ्या वडिलांनीसुद्धा जबाबदारी घेत राजीनामा होता. त्याप्रमाणे आता नाना पटोले यांनी सुद्धा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, असं देशमुख म्हणाले. उमेदवाराचा पराभव हा नेत्याचा पराभव असतो. राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकले नाही. भाजपनं महाविकास आघाडीची मतं फोडली. कारण नेतृत्व सक्षम नव्हतं, असंही ते म्हणाले. आता त्यांनी नाना पटोले यांच्यावर रोष व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असं ते म्हणाले.
राज्यसभेच्या उमेदवारीवरूनही नाराजी
राज्यसभेची उमेदवारी इम्रान प्रतापगडी यांना दिल्यानंतर अशाच प्रकारची नाराजी आशिष देशमुख यांनी व्यक्त केली होती. त्यानंतरही इम्रान प्रतापगडी हे निवडून आले. त्यानंतर आता काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे हे विधान परिषदेत पराभूत झाले. त्यामुळं आता पुन्हा एकदा नाराजीचा सूर आशिष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या महासचिवपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं.