Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांचा काँग्रेसला घरचा आहेर, प्रदेशाध्यक्ष निवडताना निवडणूक का नाही?
आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. आताही वेळ गेली नाही. राष्ट्रीय अध्यक्षाप्रमाणे प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्ष लोकशाही पद्धतीनं निवडणूक करुन निवडावे. काँग्रेसने महाराष्ट्रासह,देशभरातील सर्व राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.
नागपूर : काँग्रेसमध्ये (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना लोकशाही पद्धतीचा अवलंब केला जातोय. मग प्रदेश अध्यक्ष निवडताना ही पद्धत का नाही? असा सवाल आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केलाय. काँग्रेसने देशभरात प्रदेशाध्यक्ष निवडताना आणि प्रदेश पदाधिकारी निवडताना काँग्रेसच्या संविधानानुसार मतदान व्हावं, अशी मागणी केलीय. आशिष देशमुख म्हणाले, पल्लम राजू प्रदेश रिटनींग ॲाफिसर यांचा मेल आलाय. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका आणि अध्यक्षाची निवडणूक आहे. काँग्रेसच्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे. पण हीच पद्धती महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षाला (State President) लागू होत नाही का? देशभरातील प्रदेशाच्या अध्यक्षासाठी पण निवडणूक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
नाना पटोले यांच्या निवडीला आक्षेप
राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना लोकशाहीची पद्धत आणि प्रदेश अध्यक्ष निवडताना ही पद्धत नाही, त्यामुळे हा फार्स आहे का, असा सवाल देशमुख यांनी विचारला. प्रदेश पदाधिकारी निवडीत काँग्रेसच्या संविधानानुसार नाही.आशिष देशमुख यांचा नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्ष निवडीवर आक्षेप आहे.
लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यावी
आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. आताही वेळ गेली नाही. राष्ट्रीय अध्यक्षाप्रमाणे प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्ष लोकशाही पद्धतीनं निवडणूक करुन निवडावे. काँग्रेसने महाराष्ट्रासह,देशभरातील सर्व राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.
प्रशांत किशोर नागपुरात येणार
28 सप्टेंबरला नागपुरातील चिटणीस सेंटर येथे बैठक होणार आहे. यावेळी ते स्वतंत्र विदर्भाबाबत भूमिका जाहीर करतील. 28 तारखेला प्रशांत किशोर विदर्भवादी नेत्यांसोबत बैठक करणार आहेत. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या निमंत्रणावरुन प्रशांत किशोर येणार आहे. विदर्भ आंदोलनाची रणनिती ठरवण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाणार आहे.
28 सप्टेंबरला नागपूर कराराला 70 वर्षे
28 सप्टेंबरला नागपूर कराराला 70 वर्षे सुरु होत आहे. त्यानिमित्तानं 28 तारखेला प्रशांत किशोर नागपुरात सभा घेणार आहेत. यासाठी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना मात्र निमंत्रण नाही. अशी माहितीही काँग्रेस नेते विदर्भवादी डॅा. आशिष देशमुख यांनी माहिती दिली.
भाजपची स्वतंत्र विदर्भाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस विदर्भवादी नेते आहे. नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भासाठी लेखी आश्वासन दिलं होतं. याची आठवणही देशमुख यांनी करून दिली. मुख्यमंत्र्यांचे पाय अद्याप विदर्भात पडले नाही, अशी टीकही त्यांनी केली.