नागपूरसह रत्नागिरीत ऑटोरिक्षाचा प्रवास महागला; प्रति किलोमीटरमागे चार रुपयांची वाढ, प्रवाशांना आर्थिक फटका

आज नागपूरसह रत्नागिरीमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. भाडे प्रति किलोमिटरमागे चार रुपयांनी वाढवण्यात आले आहे.

नागपूरसह रत्नागिरीत ऑटोरिक्षाचा प्रवास महागला; प्रति किलोमीटरमागे चार रुपयांची वाढ, प्रवाशांना आर्थिक फटका
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 9:14 AM

नागपूर : नागपूरकरांसाठी (Nagpur) महत्त्वाची बातमी आहे. नागपूरकरांना आता रिक्षाच्या (Auto rickshaw) प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ऑटोरिक्षाचा प्रवास महाग झाला आहे. प्रति कोलोमीटरमागे रिक्षाच्या भाड्यात (Fare increase) चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक किलोमीटरसाठी 18 रुपये तर दीड किलोमीटरसाठी 27 रुपयांचे भाडे द्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. तसेच आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आल्याने वाहन कर्ज देखील महाग झाले आहे. वाहन करात देखील वाढ करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षाचालकांकडून सुरू होती. अखेर आज भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात तब्बल आठ वर्षांनंतर आरटीओकडून भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

रिक्षाचालकांना मोठा दिलासा

आरटीओकडून भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति कोलोमीटरमागे रिक्षाच्या भाड्यात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या  काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर जरी असले तरी पूर्वीच त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने वाहन कर्ज देखील महाग झाले आहे. वाहन कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर वाहन करामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठिण झाले होते. मात्र आता भाडेवाढ करण्यात आल्याने या निर्णयामुळे रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

रत्नागिरीत भाडेवाढ

दरम्यान दुसरीकडे आज रत्नागिरीमध्ये देखील रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. शहरात रिक्षाचे भाडे प्रति किलोमीटरमागे चार रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी ग्राहकांना 31 रुपये मोजावे लागणार आहेत. तर त्यानंतर पुढील प्रत्येक दीड किलोमीटरसाठी 20.49 रुपये मोजावे लागणार आहेत. खटूआ समितीने केलेल्या निर्देशानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचे आरटीओच्या वतीने सांगण्यात आले. एकीकडे भाडेवाढ करण्यात आल्याने रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे या भाडेवाढीचा अतिरिक्त भार आता प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.