Nagpur | बाबा जुमदेव यांचा जन्मदिन : महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम, परमात्मा एक मानव धर्माची स्थापना
बाबा जुमदेव यांनी मानव धर्माची (Manav Dharmachi) स्थापना केली. जुमदेव यांच्या कामाची दखल केंद्र सरकारनं घेतली. एक ऑक्टोबर 2013 रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. हमीद अंसारी यांच्या हस्ते बाबा जुमदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एका टपाल तिकीटाचं (postage stamp) अनावरण करण्यात आलं.
जुमदेवजी ठुबरीकर (Jumdevji Thubarikar) यांचा जन्म तीन एप्रिल 1921 रोजी झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांचे वडील विठोबा ठुबरीकर हे विणकर होते. आई सरस्वताबाई गृहिणी होत्या. जुमदेव यांना आणखी चार भावंडं होती. बाळकृष्ण, नारायण, जागोबा, मारोती अशी त्यांच्या भावंडांची नावं. बाबा जुमदेव यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचे लग्न वाराणसीबाई यांच्याशी झाले. लग्न झालं ते वर्ष होतं 1938. जुमदेव यांनी वडिलोपार्जित विणकर व्यवसाय सोडला. त्यानंतर त्यांनी सोनारकाम केलं. सेठ केसरीमल यांच्याकडं ते काम करतं. त्यानंतर नागपूर महापालिकेत कंत्राटदार म्हणूनही त्यांनी काम केलं. बाबा जुमदेव यांनी मानव धर्माची (Manav Dharmachi) स्थापना केली. जुमदेव यांच्या कामाची दखल केंद्र सरकारनं घेतली. एक ऑक्टोबर 2013 रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. हमीद अंसारी यांच्या हस्ते बाबा जुमदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एका टपाल तिकीटाचं (postage stamp) अनावरण करण्यात आलं.
मुलगा महादेव शास्त्रज्ञ
बाबा जुमदेव यांना महादेव नावाचा मुलगा आहे. गरीब परिस्थितीमुळं उच्च शिक्षण घेण कठीण झालं होतं. पण, बाबांनी महादेवला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. त्यामुळं महादेव हे इंजिनीअर झाले. जागतिक पहिल्या दहा नामांकित शास्त्रज्ञांपैकी महादेव हे एक आहेत.
मानव धर्माची स्थापना
बाबा जुमदेव यांचा कल समाजसुधारणेकडं होता. लोकं व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी बाबांनी परमात्मा एक मानव धर्माची स्थापना केली. मानव धर्म स्वीकारणाऱ्या कित्तेक लोकांच्या जीवनातून दारू हद्दपार झाली. अंधश्रद्धेवरही त्यांनी प्रहार केला. विदर्भात त्यांचे हजारो अनुदायी आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या मानव धर्माचं काम आता राज्याबाहेरही गेले आहे.
चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम
चार तत्व – परमात्मा एक, भगवानाच्या नावावर जन्म, मृत्यू, दुःख मिटवा, इच्छेनुसार भोजन करा. तीन शब्द – खरे बोला, मर्यादांचे पालन करा, प्रेमाने व्यवहार करा. पाच नियम – भक्ती आणि समर्पण, कुटुंब आणि अनुयायांत प्रेम, वाईट व्यसन बंद करा, कुटुंब, अनुयायांत एकता, कुटुंबाला मर्यादित ठेवा.